शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांचीही मॅरेथॉन धाव, ४२ किमी.चे अंतर साडेचार तासांत पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 00:18 IST

- हितेन नाईक पालघर : स्वत:चे आरोग्य, स्वत:च्याच हाती असून ते जपायला हवे असा आरोग्य जपण्याचा अनमोल संदेश देत ...

- हितेन नाईकपालघर : स्वत:चे आरोग्य, स्वत:च्याच हाती असून ते जपायला हवे असा आरोग्य जपण्याचा अनमोल संदेश देत पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत आपला सहभाग नोंदवीत ४२ किलोमीटर अंतर ४ तास ४१ मिनिटे २७ सेकंदात पूर्ण करण्यात यश मिळवले.आशियातील सर्वात मोठी व मानाच्या समजल्या जाणा-या प्रतिष्ठेच्या १७ व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये एकूण ५५ हजार ३२२ धावपटूंनी सहभाग नोंदवला होता. जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बांद्रा रेक्लमेशन अशा ४२ किलोमीटरच्या मुख्य स्पर्धेत धावपटू म्हणून सहभाग घेत ही मॅरेथॉन ४ तास ४१ मिनिटे २७ सेकंदात पूर्ण करण्यात यश मिळविले. जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी मॅरेथॉन पूर्ण करणाºया एकूण ७ हजार ८०३ धावपटूंमधून २ हजार ६५३ वे स्थान प्राप्त केले. पुरुष गटातून ७ हजार ११३ धावपटूमधून २ हजार ४९६ वे स्थान तसेच ५० ते ५४ पुरुष वयोगटातून ६६४ धावपटूमधून १६४ वे स्थान पटकावले आहे.जीवनशैलीत झपाट्याने बदल होत असतानाच ताणतणावही तितक्याच झपाट्याने वाढत आहेत. त्याचे विपरीत परिणाम तरुणांच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसत आहेत. अनेक तरुणांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबाबत सजगता दिसून येत नसल्याचेही ते म्हणाले.शारीरिक स्वास्थ्य टिकवाआरोग्य टिकवण्यासाठी आपला फिटनेसही तितकाच महत्त्वाचा असल्याने त्यांनी मैदानी खेळ, व्यायामासाठी पुढे यायला हवे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शारीरिक स्वास्थ्य टिकवून निरोगी जीवन जगता यावे यासाठी मॅरेथॉन तसेच मैदानी खेळ खेळावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.

टॅग्स :Mumbai Marathonमुंबई मॅरेथॉनVasai Virarवसई विरार