शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

ढोल अन् लेझीम सातासमुद्रापार; कॅनडाचे पंतप्रधान मराठी संस्कृतीच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 3:15 AM

णेशोत्सवानिमित्त खुद्द कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो मराठी संस्कृतीच्या प्रेमात पडले असून त्यांच्याकडून मराठी बांधवांनी पाठीवर कौतुकाची थाप मिळवली आहे.

- अजय महाडीकमुंबई : नोकरी धंद्या निमित्ताने परदेशात स्थायिक झालेल्या मराठी बांधवांनी मराठी बाणा कायम ठेवत आपली संस्कृती जपायला सुरूवात केली आहे. गणेशोत्सवानिमित्त खुद्द कॅनडाचेपंतप्रधान जस्टीन टुडो मराठी संस्कृतीच्या प्रेमात पडले असून त्यांच्याकडून मराठी बांधवांनी पाठीवर कौतुकाची थाप मिळवली आहे. वसई येथील रहिवाशी व सध्या कॅनडामध्ये स्थायिक असणारे विराज पाटील यांनी लोकमतला ही माहिती दिली.कॅनडा हा संस्कृती व कलेचा आदर करणारा देश आहे. येथे अनेक जाती धर्माचे लोक राहत असून त्यात मराठी लोकांची संख्या लक्षणीय आहे. कॅनडातील अल्बर्टा राज्यात मराठी बांधव जास्त आहेत. नुकतेच ५ सप्टेंबर रोजी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांनी एडमंटन येथील हिंदू मंदिरांना भेटी दिल्या.त्यावेळी तेथील मराठी मंडळाकडून गणेशोत्सवातील ढोल आणि लेझीम पथकाकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. दरवर्षी हजारो कॅनडावासीय महाराष्ट्रीयन गणेशोत्सव मिरवणूकीतील मराठी समुदायाचे लेझिम कौशल्य पहायला गर्दी करीत असतात. त्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान स्वत: येणार असल्यामुळे आयोजकांनी जबाबदारी स्थानिक मराठी मंडळावर टाकली होती. या मंडळाच्या अध्यक्ष अनुपमा शेट्टी व खजिनदार विराज पाटील यांची ही जबाबदारी लिलया पेलली.पंतप्रधान जस्टीन टुडो यांचे आगमन होताच मराठी मंडळाच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन मराठमोळ्या पद्धतीने पाटावर बसवून कुंकुम तिलक करत ओक्षण करण्यात आले. आणि मग मिरवणूकीला सुरूवात झाली. सर्वात पुढे लेझीम पथक, त्याच्या मागे ढोल, ताशा आणि झांज पथक आणि त्यामागोमाग पंतप्रधान आणि मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री असा मिरवणूकीचे जल्लौषपुर्ण स्वरूप होते.वसई येथील वासळई गावातील विराज पाटील व रचना पाटील हे दांपत्य गेली काही वर्षे कॅनडात नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत. त्यांचाही यात महत्वाचा सक्रीय सहभाग होता. या मराठी मंडळात अनुपमा शेट्टी, विराज पाटील, रचना पाटील, सचिन पाटील, अनिता वानखडे, अमित लोणकर, समीर गोखले, अमोल सगरे, संजय देशपांडे, राकेश शेट्टी, दिपाली पाटील, भाग्यश्री, नेहा लोणकर, प्रणिता गोखले, सूज्ञा पंडीत, रूची पाटील, ऋच्या गोखले, अवनी लोणकर , आदित्य दातार , ऋित्व म्हात्रे हे सहकारी सहभागी झाले होते.सातासमुद्रापार मराठीचा झेंडा फडकवत आपली संस्कृती व परंपरा जपत आपले सणही तितक्याच उत्साहात साजरा करणाऱ्या या मराठी बांधवांचे आता सर्व स्तरातून कौतुक होत आहे.मराठी सण -उत्सवात दुसºया पिढीचाही उत्साह वाखाणण्याजोगा...कॅनडातील एडमंटन येथे वास्तव्यास असलेले मराठीजन यामध्ये उत्साहात सहभागी झाले होते. ढोल, लेझिम, झांज पथकासोबत गणपती बाप्पा व छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत परिसर दणाणून सोडला होता. पारंपारिक मराठी पेहरावात पंतप्रधानांच्या स्वागत मिरवणूकीत सहभागी झालेल्या मराठी स्त्री पुरूषांनी लक्ष वेधून घेतले होते. विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे विदेशात जन्मलेली मराठी जनांची दुसरी पिढीही तितक्याच उत्साहात यात सहभागी झाली होती.घरापासून दुर असल्यामुळे आपल्या माणसांसोबत सण साजरे करता येत नसल्याची खंत होती. मात्र, कॅनडात एवढी लोक एकत्र येऊन एका कुटूंबासारखे सर्व सण साजरे करतो. फक्त गणेशोत्सव नाही तर महाराष्ट्र दिन, शिवजयंती, गुढीपाडवा, नवरात्र, दसरा-दिपावली सण साजरे होतात.- रचना विराज पाटील, वसई (आता कॅनडा येथे स्थायीक )

टॅग्स :CanadaकॅनडाJustin Trudeauजस्टीन ट्रुडोprime ministerपंतप्रधानVasai Virarवसई विरार