शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खासदार, आमदारांना सतत सांगूनही दातीवरेत महिन्यातून एकदाच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 13:02 IST

पालघर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सत्ताधारी पक्षाचे खासदार राजेंद्र गावित आणि बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार राजेश पाटील हे दोन मोठे नेते असूनही यांच्या मतदारसंघातील पालघर तालुक्यात दातीवरे गावात महिन्यातून एकदाच पाणी येते.

- हितेन नाईकपालघर - पालघर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सत्ताधारी पक्षाचे खासदार राजेंद्र गावित आणि बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार राजेश पाटील हे दोन मोठे नेते असूनही यांच्या मतदारसंघातील पालघर तालुक्यात दातीवरे गावात महिन्यातून एकदाच पाणी येते. खड्डा खणून तहान भागवावी लागते. गेल्या चार-पाच वर्षांपासून हीच परिस्थिती  असून आमदार-खासदारांकडे तक्रारी करुनही ग्रामस्थांची पाण्यासाठीची वणवण थांबलेली नाही.केळवा माहीम प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना १७ गावांसाठी बनवलेली आहे. १९८० मध्ये सुरू झालेल्या या योजनेतील अडचणींबाबत निवेदने, आंदोलने करूनही समस्यांकडे पाणीपुरवठा विभागाने लक्ष न दिल्याने  रडतखडत ही योजना नावापुरची सुरू आहे. योजनेत दातीवरे हे शेवटचे गाव. माहीम, केळवे, माकुनसार, दांडा खटाळी, आगरवाडी, खर्डी, नगावे, वाकसई, तिघरे, अंबोडे, कोरे, वेढी, डोंगरे, मथाने, एडवण, भादवे आणि विळंगी गावांचा समावेश आहेत. 

जमिनीत खड्डा खणून भागवावी लागते तहानगावातील ८५ वर्षीय ज्येष्ठ महिला मंजुबाई वसईकर यांच्यासह गावातील अनेक नागरिकांना जमिनीत खड्डा खणून त्यातून पाणी घ्यावे लागते. दूषित पाण्यामुळे आजारही होतात. उपचारासाठी सात किलोमीटरवर एडवन प्राथमिक आरोग्य केंद्रात पायीच जावे लागते, असे ग्रामस्थ जितेंद्र तांडेल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

माझ्याकडे  ग्रामस्थांच्या तक्रारी आल्या होत्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे उपाययोजनांसाठी सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने नवीन योजना कार्यान्वित केली जात आहे.- राजेंद्र गावित, खासदार, शिंदेसेना 

गळतीमुळे योजनेतील शेवटचे गाव असलेल्या दातीवरे पर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यासाठी जीवन प्राधिकरण मार्फत १८ कोटींची योजना सुरू आहे. तात्पुरत्या स्वरूपात टँकरद्वारे पाणी पोहोचविण्याची व्यवस्था करतो.- आ. राजेश पाटील, बोईसर

पाणीबिलाच्या रकमेचा गैरव्यवहार     वेढी गावाचा पाणीपुरवठा बंद असून अन्य १६ गावांची ९८ लाख ७२ हजार ७१५ रुपयांची पाण्याची थकबाकी असल्याचे पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंते संतोष शिरसीकर  यांनी ‘लोकमत’ला सांगितले.      दातीवरे ग्रामस्थांनी भरलेल्या रकमेचा ग्रामपंचायतीकडून गैरव्यवहार झाल्याची तक्रार मनसेचे  तालुका उपाध्यक्ष चेतन वैद्य यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.      जलजीवन मिशनअंतर्गत नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्याचे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पालघर विभागाकडून अजूनही पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे दातीवरे गावाला नियमित पाणी येण्यास किमान वर्षभर वाट पाहावी लागेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीकपातpalghar-pcपालघरmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४