दांडेकर कॉलेजमध्ये विज्ञान कार्यशाळा संपन्न

By Admin | Updated: April 24, 2016 02:03 IST2016-04-24T02:03:30+5:302016-04-24T02:03:30+5:30

पालघरमधील दांडेकर महाविद्यालयात आदिवासी शाळांमधील विज्ञान शिक्षकांची तीन दिवसीय कार्यशाळा नुकतीच झाली. भारत सरकारच्या विज्ञान व प्रादयौगीक विभागामार्फत

Dancing concluded the science workshop in Dandekar College | दांडेकर कॉलेजमध्ये विज्ञान कार्यशाळा संपन्न

दांडेकर कॉलेजमध्ये विज्ञान कार्यशाळा संपन्न

पालघर/नंडोरे : पालघरमधील दांडेकर महाविद्यालयात आदिवासी शाळांमधील विज्ञान शिक्षकांची तीन दिवसीय कार्यशाळा नुकतीच झाली. भारत सरकारच्या विज्ञान व प्रादयौगीक विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या विज्ञान प्रसार संस्थेने आयोजिली होती. ती मध्ये पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातून ५० शाळेच्या विज्ञान शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला. या तीन दिवसीय कार्यशाळेला वैज्ञानिक अरविंद रानडे व विविध राज्यातून आलेल्या सहा तज्ज्ञ विज्ञान शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शनही लाभले.
तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन झाल्यावर वैज्ञानिक डॉ. रानडे, अशोक त्रिपाठी, व आयुका. पुण्याचे प्रशांत पुरोहित यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी सर्व विज्ञान शिक्षकांना रात्रीच्या वेळी या निमित्ताने जवळून अवकाश दर्शन करण्याची संधी मिळाली तर तिसऱ्या व शेवटच्या दिवशी डॉ. रानडे यांनी विज्ञान शिक्षकांना सूर्याविषयी दिलेली माहिती लक्षणीय ठरली. तसेच चित्रपटातून विज्ञान कसे शिकवता येईल याबद्दलचे मार्गदर्शन फिल्ममेकर भरत शितोळे यांनी यावेळी केले. लातूरहून या कार्यशाळेसाठी आलेल्या महाजन यांनी पदार्थ विज्ञान विषयीचे विज्ञान अगदी सहज व सोप्या भाषेत उपस्थित शिक्षकांसमोर मांडले.
या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी सो. दा. शि. मंडळाचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी केल्याबद्दल डॉ. रानडे यांनी महाविद्यालयाचे आभार मानले व विद्यान प्रसार संस्थेमार्फत सहभागी शिक्षकांना टेलीस्कोप भेट देण्यात आले. आयोजनाबद्दल सहभागींनी समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: Dancing concluded the science workshop in Dandekar College