शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूत अवैध बांधकामांना चढला जोर

By admin | Updated: March 28, 2016 02:24 IST

डहाणू तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूका रेशनकार्डाला आधारकार्डाशी संलग्न करणे, शिवाय मार्च अखेर असल्याने सरकारी कामानिमित्त डहाणू तालुका मुख्यालयात मंडळ

- शौकत शेख,  डहाणूडहाणू तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूका रेशनकार्डाला आधारकार्डाशी संलग्न करणे, शिवाय मार्च अखेर असल्याने सरकारी कामानिमित्त डहाणू तालुका मुख्यालयात मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यासह शासकीय यंत्रणा गुंतलेली असल्याचा पुरेपूर फायदा घेऊन माती, रेती माफियांनी डहाणूतील चिंचणी, वानगाव, ऐना, चिखला, आंबेसरी, जामशेत, ऐना, दाभोण, निकाणे, दापचरी, कासार, चारोटी, आशागड, सावरा येथे हैदोस घातला आहे.डहाणू तालुक्यात येत्या १७ एप्रिल रोजी होणाऱ्या ६२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका घेण्यासाठी महसूल आणि पोलीस अधिकारी कामात व्यस्त असल्याचा फायदा उठवून डहाणू तालुक्यात कासा, आशागड, चिंचणी या भागात विशेषत: उपनगरात बेकायदा बांधकामांना अक्षरश: ऊत आला आहे. डहाणू-जव्हार राज्यमार्गावरील चारोटी, कासा येथे केवळ ग्रामपंचायतीच्या परवानगीने रस्त्याच्याकडेला मोठेमोठे गाळे बांधले जात आहे. विशेष म्हणजे गेल्या चार दिवसांपासून सलग सुट्ट्या आल्याने रात्रंदिवस बांधकाम सुरु होते तर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नवीन शर्तीचा सर्रासपणे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दरम्यान गेल्या चार दिवसांपासून सुट्ट्या असल्याने येथील माती, रेती माफियांनी धुमाकूळ घातला आहे. गुजरात येथील गोड डहाणू, बोईसर भागात प्रचंड मागणी असल्याने दररोज पहाटे मोठ्या प्रमाणात रेतीचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडाला आहे. तर डहाणूच्या जंगलपट्टी भागातील आंबेसरी, ऐना, सायवन, गंजाड भागात केवळ नाममात्र म्हणजेच पाच, दहा, ब्रास मातीची वाहतूकीची रॉयल्टी घेऊन शेकडो ब्रास मातीची वाहतूक करण्यात आली आहे. वानगाव, देहणे, आगवन भागात गेल्या चारपाच दिवसांपासून डोंगरदऱ्यात उत्खनन सुरु असून महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संशय व्यक्त केले जात आहे.