शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू पं.स. प्रवेशद्वार उघडणार कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 00:24 IST

आदिवासी, गरीब नागरिकांवर दडपण ; शासकीय कर्मचारी, ठेकेदार घेतात पार्किंग सुविधा

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : राज्य शासनाने लॉकडाऊन शिथिल करताना, लोकलसेवा, हॉटेल, मंदिरे आणि त्यानंतर शाळांचेही दरवाजे नागरिकांसाठी उघडले. मात्र डहाणू पंचायत समिती इमारतीसमोरील मुख्य प्रवेशद्वार अद्याप बंद आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्या महागड्या गाड्या तेथे पार्किंग केल्या जातात. त्यामुळे आदिवासी आणि गरीब नागरिकांना प्रशासकीय इमारतीत प्रवेश करताना दडपण येते. याकरिता तत्काळ हे प्रवेशद्वार उघडण्याची गरज व्यक्त होत आहे.

डहाणू हा आदिवासीबहुल तालुका असून ८५ ग्रामपंचायतींचा कारभार पारनाका येथील पंचायत समितीच्या इमारतीतून चालतो. कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या. त्याअंतर्गत या प्रशासकीय इमारतीसमोरील मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दक्षिणेकडील अन्य प्रवेशद्वाराचा वापर केला जातो. या तालुक्यात सुमारे चार लाख लोकसंख्या असून विविध कामाकरिता नागरिक येथे येतात. तर

लोकप्रतिनिधी नागरिकांच्या समस्या घेऊन गटविकास अधिकारी तसेच अन्य विभाग प्रमुखांची भेट घेतात. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या कार्यालयाकडे येणाऱ्यांची गर्दी वाढत आहे. परंतु पंचायत समिती प्रशासनाने मुख्य प्रवेशद्वार उघडण्याचा निर्णय न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हे प्रवेशद्वार बंद असल्याने शासकीय कर्मचारी या जागेचा वापर चारचाकी पार्किंगसाठी करतात. त्यापैकी अनेक कर्मचारी, ठेकेदार कारला खेटून ग्रुपचर्चा तसेच मोबाईलवर संभाषण करतात. अनेक खाजगी वाहनांवर महाराष्ट्र शासनाच्या पट्ट्या लावलेल्या असतात. या महागड्या गाड्या पाहून साध्याभोळ्या आदिवासींची पावले पुढे जाण्यास धजावत नाहीत.

इमारतीच्या आवारात पार्किंगची समस्या आणि कोरोनामुळे गर्दीचे नियोजन करण्याच्या उद्देशाने मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवले होते. नागरिकांची मागणी असल्यास मुख्य प्रवेशद्वार उघडण्यात येईल.      - बी.एच.भरक्षेगटविकास अधिकारी, डहाणू पंचायत समिती.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार