शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

मते मिळवण्यासाठी नगरसेवकांची फिल्डिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 23:49 IST

बंडखोरांनाही पाठिंबा : बैठका, पदयात्रांसह व्यक्तिगत भेटीगाठींवर भर

प्रशांत माने।
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण पश्चिम, पूर्व, ग्रामीण आणि डोंबिवली विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सर्वच पक्षांकडून जाहीर सभा आणि रॅलीवर भर दिला जात असताना, नगरसेवकांची फळीही जोमाने प्रचारात उतरली आहे. बैठका, प्रभागांतील पदयात्रांसह व्यक्तिगत भेटीगाठींकडे नगरसेवकांचा कल असला तरी, कल्याण पश्चिम आणि पूर्व मतदारसंघात काही नगरसेवक बंडखोरांच्या प्रचारातही मग्न असल्याचेही चित्र पाहावयास मिळत आहे.


कल्याण परिक्षेत्राचा विचार करता केडीएमसीच्या २०१५ च्या निवडणुकीत शिवसेनेचे ५३, भाजपचे ४३, काँग्रेसचे ४, राष्ट्रवादीचे २, मनसे १०, बसपा १, एमआयएम १ असे नगरसेवक निवडून आले. डोंबिवलीत शिवसेनेचे १२, कल्याण ग्रामीण आणि पूर्व भागात एकूण १७ नगरसेवक असून, कल्याण पश्चिममध्ये सर्वाधिक २१ नगरसेवक आहेत.


भाजपचे डोंबिवलीत १९, तर कल्याण ग्रामीण आणि पूर्व मिळून १८ नगरसेवक, तर कल्याण पश्चिमेत सात नगरसेवक आहेत. काँग्रेसचे डोंबिवलीत ३, तर कल्याण पूर्वेत १ नगरसेवक आहे. कल्याण पश्चिम आणि ग्रामीणमध्ये काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही. राष्ट्रवादीचेही कल्याण पश्चिमेत दोनच नगरसेवक आहेत. डोंबिवली, कल्याण पूर्व आणि ग्रामीणमध्ये त्यांचा एकही नगरसेवक नाही. मनसेचे कल्याण पश्चिम आणि डोंबिवलीत प्रत्येकी चार, तर कल्याण ग्रामीणमध्ये १ नगरसेवक आहेत. कल्याण पूर्व मतदारसंघात उल्हासनगरमधील १० प्रभागांचा समावेश होतो. यात आठ नगरसेवक शिवसेनेचे, तर साई पक्षाचे दोन नगरसेवक आहेत. कल्याण ग्रामीण मतदारसंघात मोडणाऱ्या दिवा भागात ११ प्रभाग आहेत. यात आठ नगरसेवक सेनेचे, तर तीन नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत.


शिवसेना आणि भाजपकडे नगरसेवकांची भक्कम फळी आहे. आघाडीकडे आणि मनसेकडे नगरसेवकांचे फारसे बळ नाही. दरम्यान, प्रभागातील मतदारांचा संपर्क ठेवण्याबरोबरच बैठका, पदयात्रांवर भर देण्याच्या सूचना नगरसेवकांना करण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने नगरसेवक कामालाही लागले आहेत.


नगरसेवक बंडखोर उमेदवारांच्याही दिमतीला
कल्याण पश्चिम आणि पूर्व मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांसमोर बंडखोरांचे आव्हान उभे ठाकले आहे. कल्याण पश्चिमेत भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांनी, तर पूर्वेत शिवसेनेचे उल्हासनगरमधील विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरीवरून नेत्यांनी कारवाईची तंबी दिली असली, तरी पूर्वेतील शिवसेनेच्या २६ नगरसेवकांनी बोडारे यांना पाठिंबा दिला आहे. ते त्यांचा प्रचार करत आहेत. विशेष बाब म्हणजे पूर्वेतील भाजपचा एक नगरसेवक उघडपणे बोडारेंचा प्रचार करीत आहे. दुसरीकडे पश्चिमेतही पवारांच्या पाठीशी भाजपचे दोन नगरसेवक आहेत. त्यांनी नरेंद्र पवारांच्या प्रचारात हिरिरीने सहभाग घेतला आहे.