CoronaVirus News : 'पालघर जिल्ह्यातील वसई तालुका वगळता उर्वरित क्षेत्र 'रेड झोन' मधून वगळा'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 08:10 PM2020-05-03T20:10:51+5:302020-05-03T20:21:04+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: 'पालघर जिल्ह्यात वसई, पालघर वाडा, जव्हार, विक्रमगड इत्यादी तालुके येतात. यापैकी वसई तालुका व वसई विरार शहर महापालिका हद्दीमध्ये कोरोना मुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे.'

CoronaVirus Marathi News Exclude the rest of Palghar district from red zone except Vasai SSS | CoronaVirus News : 'पालघर जिल्ह्यातील वसई तालुका वगळता उर्वरित क्षेत्र 'रेड झोन' मधून वगळा'

CoronaVirus News : 'पालघर जिल्ह्यातील वसई तालुका वगळता उर्वरित क्षेत्र 'रेड झोन' मधून वगळा'

googlenewsNext

आशिष राणे

वसई - पालघर जिल्ह्यातील वसई तालुका वगळता उर्वरित क्षेत्र "रेड झोन" मधून वगळण्याची महत्त्वपूर्ण मागणी पालघर लोकसभेचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शनिवारी एका विनंती पत्राद्वारे केली असल्याची माहिती राजेंद्र गावित यांनी लोकमतला दिली. विशेष म्हणजे खासदारांचे हे पत्र शनिवारचे असून ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

गावित यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या विनंती पत्रात 'पालघर जिल्ह्यात वसई, पालघर वाडा, जव्हार, विक्रमगड इत्यादी तालुके येतात. यापैकी वसई तालुका व वसई विरार शहर महापालिका हद्दीमध्ये कोरोना मुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामध्ये वसई तालुक्यात 134 रुग्ण संख्या असून यापैकी 57 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. तर यातील 8 रुग्ण मयत असून उर्वरित 69 रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचसोबत पालघर तालुक्यात 16 रुग्ण असून यातील केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे आणि डहाणू तालुक्यात 8 रुग्ण आहेत' असं म्हटलं आहे.

'जिल्ह्यातील वसई, पालघर आणि डहाणू असे तीन तालुके वगळता उर्वरित तालुक्यात रुग्ण संख्या ही शून्य आहे. परिणामी संपूर्ण जिल्हा "रेड झोन" घोषित केल्यास येथील अनेक उद्योग धंद्यावर याचा मोठा परिणाम होईल, तसेच लोकांना रोजगार ही मिळणार नाही आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य शासनाने पालघर जिल्यातील एकमेव वसई विरार शहर महापालिकेचे क्षेत्र वगळता इतर भाग हा "ऑरेंज झोन "मध्ये समाविष्ट करा' अशी मागणी राजेंद्र गावित यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : 500 रुपयांसाठी त्या आजींनी रात्रभर केला 50 किमी पायी प्रवास पण....

CoronaVirus News : 1200 मजुरांना घेऊन वसई रोड ते गोरखपूर अशी पहिली विशेष ट्रेन रवाना!

भयंकर! BSF जवानाकडून आधी अधिकाऱ्याची हत्या, नंतर केली स्वत: आत्महत्या

CoronaVirus News : 'असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद'; अखिलेश यादव यांचं मोदी सरकारवर टीकास्त्र

बापरे! Reliance Jio च्या लाखो युजर्सचा डेटा ऑनलाईन लीक

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये लपून-छपून भेटणं पडलं महागात, 'त्या' दोघांना गावकऱ्यांनी पाहिलं अन्...

 

Web Title: CoronaVirus Marathi News Exclude the rest of Palghar district from red zone except Vasai SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.