CoronaVirus News : 1200 मजुरांना घेऊन वसई रोड ते गोरखपूर अशी पहिली विशेष ट्रेन रवाना!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 04:48 PM2020-05-03T16:48:36+5:302020-05-03T17:01:18+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: पालघर जिल्ह्यातील वसई रोड शहरांमधून उत्तरप्रदेश मधील गोरखपूर येथे जाणारी पहिली लांब पल्ल्याची विशेष रेल्वे गाडी शनिवारी रात्री 4 वाजता सोडण्यात आली.

CoronaVirus Marathi News special train VasaiRoad to Gorakhpur SSS | CoronaVirus News : 1200 मजुरांना घेऊन वसई रोड ते गोरखपूर अशी पहिली विशेष ट्रेन रवाना!

CoronaVirus News : 1200 मजुरांना घेऊन वसई रोड ते गोरखपूर अशी पहिली विशेष ट्रेन रवाना!

Next

आशिष राणे

वसई - संपूर्ण जगात व देशभरात कोरोना विषाणूचा उद्रेक व लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरीत कामगार- मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारच्या पश्चिम रेल्वे प्रशासनाने पालघर जिल्ह्यातील वसई रोड रेल्वे स्थानकातून उत्तरप्रदेश राज्याच्या गोरखपूर शहरासाठी (0957) पहिली विशेष रेल्वे गाडी शनिवारी रात्री उशिरा 4 वाजता रवाना झाल्याची माहिती वसई प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे यांनी लोकमतला दिली.

शनिवारी मध्यरात्री रवाना झालेली ही गाडी महाराष्ट्र राज्यासह गुजरात, मध्यप्रदेश ,राजस्थान आणि उत्तरप्रदेश अशा चार राज्यांतून जाणार आहे तसेच ही गाडी साधारण 4 मे रोजी दुपारी 2 वाजता गोरखपूर स्थानकात पोहचेल.  टाळेबंदीच्या काळात पालघर जिल्ह्यांच्या विविध भागात खास करून वसई व नालासोपारात मजूर व कामगार वर्ग अडकून पडले होते. दरम्यान 22 डब्यांच्या या विशेष गाडीत एकूण 1200 प्रवासी असून या प्रवासासाठी 740 रुपये तिकीट आकारण्यात आले आहे. तर लॉकडाऊन नंतर जिल्हयात व वसई- नालासोपारात अडकलेल्या कामगार व मजुरांना त्यांच्या राज्यात नेण्यासाठी पालघर जिल्ह्यातून वसई स्थानकातून शनिवारी सुटलेली ही पहिलीच रेल्वे गाडी असल्याने या स्थलांतरीत कामगार व मजुरांनी सरकार स्थानिक प्रशासनाचे विशेष आभार ही मानले.



पालघर जिल्हा व स्थानिक पोलीस व महापालिका प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

वसईतून सुटणाऱ्या या गाडीसाठी विशेष व्यवस्था म्हणून पालघर जिल्हा तथा वसई महसूल विभाग आणि वसई विरार महापालिका व माणिकपूर पोलीस यांच्या कडून शनिवारी संध्याकाळ पासूनच चोख बंदोबस्त व आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. या गाडीतून स्थलांतरित केले जाणारे मजूर व कामगार यांना प्रथम विविध भागातून नवघर एस टी स्थानकात आणण्यात आले व सोशल डिस्टंसिंग पाळून त्यांची प्रथम आरोग्य तापसाणीची देखील चोख व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी या मजुरांना सोबत प्रत्येक प्रवाशाला सॅनिटायझर,चेहऱ्यावर मास्क, प्रसंगी जेवण पिण्याच्या पाण्याची सोय देखील करण्यात आली होती. वसई रोड स्टेशनचे रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलीस  व सोबत वसई विरार मनपा, वसई महसूल चे तहसीलदार व माणिकपूर पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्याकडे अजून काही नोंदी होत आहेत आतापर्यंत 32 हजार स्थलांतरित कामगार व मजुरांच्या  नोंदी झाल्या आहेत, केंद्र व राज्य सरकारचे पुढील आदेश येतील त्यानुसार आमचे नियोजन सुरू आहे. रेल्वेचे काही आदेश आले की तशी व्यवस्था आम्ही पुन्हा करू शनिवारी सुद्धा गोरखपूरसाठी 1200  कामगार रात्री ४ वाजता रेल्वे गाडी सुटून हे रवाना झाले आहेत.

- स्वप्नील तांगडे
वसई प्रांताधिकारी ,वसई उपविभाग


 

महत्त्वाच्या बातम्या

भयंकर! BSF जवानाकडून आधी अधिकाऱ्याची हत्या, नंतर केली स्वत: आत्महत्या

CoronaVirus News : 'असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद'; अखिलेश यादव यांचं मोदी सरकारवर टीकास्त्र

बापरे! Reliance Jio च्या लाखो युजर्सचा डेटा ऑनलाईन लीक

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये लपून-छपून भेटणं पडलं महागात, 'त्या' दोघांना गावकऱ्यांनी पाहिलं अन्...

CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये इंटरनेट स्लो आहे? असं करा ऑफलाईन Tweet

 

Web Title: CoronaVirus Marathi News special train VasaiRoad to Gorakhpur SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.