शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कर्मचाऱ्यांची मुंबईत तात्पुरती सोय करावी, उच्च न्यायालयात जनहित याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 03:12 IST

अनेक कर्मचारी मुंबईतील हॉटस्पॉटमध्ये कामानिमित्त गेले आहेत आणि त्यामुळे पालघरमध्ये कोरोनाचा फैलाव होत आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

मुंबई : कोरोनाशी सामना करण्यासाठी अत्यावश्यक सेवेमध्ये रुजू असलेल्या पालघरच्या कर्मचाऱ्यांची मुंबईत तात्पुरती राहण्याची सोय करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली असून यावर उद्या सुनावणी आहे.अनेक कर्मचारी मुंबईतील हॉटस्पॉटमध्ये कामानिमित्त गेले आहेत आणि त्यामुळे पालघरमध्ये कोरोनाचा फैलाव होत आहे, असे याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. राज्य सरकारने या कर्मचाºयांची मुंबईत तात्पुरती राहण्याची सोय करावी किंवा या कर्मचाºयांना कामावर उपस्थित राहण्यास सांगू नये. कारण, यामुळे वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत राहणाºया नागरिकांचा जीव धोक्यात घातला जात आहे. मुंबईत काम करणाºया ४७ कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली आहे. मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होती. सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भट यांनी ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. भट यांचे वकील उदय वारुंजीकर यांनी न्यायालयाला सांगितले की, १ मे रोजी पालघर येथे कोरोनाचे १३६ रुग्ण आढळले. त्यातील १० रुग्णांचा मृत्यू झाला. वेळीच खबरदारी नाही घेतली तर आपल्याही जीवाला धोका आहे, अशी भीती स्थानिकांमध्ये आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbai High Courtमुंबई हायकोर्ट