शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींकडील काजू खरेदी-विक्रीला कोरोनाची घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 00:11 IST

सलग दुसऱ्या वर्षी आर्थिक नुकसान

हुसेन मेमनलोकमत न्यूज नेटवर्क जव्हार : जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यांत हजारो काजूची रोपे विविध संस्थांच्या माध्यमातून येथील आदिवासी बांधवांना लागवड करून देण्यात आली आहेत, तसेच जव्हारचे श्रीमंत यशवंतराव मुकणे महाराज यांच्या जयविलास पॅलेसच्या अवतीभवती ३० ते ४० एकरमध्ये हजारो काजूची झाडे असल्याने येथे मोठ्या प्रमाणात काजू बीचे उत्पादन निघते. त्यामुळे दरवर्षी शेकडो आदिवासी शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन म्हणून काजू बीकडे पाहिले जाते. मात्र सध्या लॉकडाऊन व संचारबंदीमुळे काजू बी खरेदी-विक्रीला घरघर लागली आहे.

काजूच्या रोपाला या भागातील जमीन लाभदायक आहे. कमी पाण्यातही काजूची रोपे जगतात. फेब्रुवारी, मार्च महिन्यात काजूच्या झाडांना मोहोर येतो, तर मार्च ते मेपर्यंत काजू गर व काजू बिया तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. तालुक्यात काही सामाजिक संस्थांनी अनुसूचित जमातीच्या आदिवासी शेतकऱ्यांना नियमित शेतीसोबत फळबागा लागवड करून दिल्या आहेत. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात काजूची झाडे लावून मागील कित्येक वर्षांपासून काजू बी विकून उत्पन्नाचे स्रोत तयार केले आहे.

काजू बी तयार झाल्यानंतर शेतकरी काजू बी जमा करतात व ते जव्हार, विक्रमगड, मोखाडा तालुक्यांच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात. तालुक्यातील व्यापारी प्रत्येक शेतकऱ्यांकडून दोन किलो, पाच किलो, १० किलो, २० किलो असा माल घेतात व त्याचा साठा करून ठेवतात. जसजसा मालाचा साठा वाढतो तसतसे हे शेतकऱ्यांकडून विकत घेणारे व्यापारी काजू तयार करणाऱ्या फॅक्टरी मालकांना विकतात. शेतकऱ्यांकडून साठा करणारे किरकोळ व्यापारी काजू बीच्या साईजनुसार भाव देतात. हा दर ९५ रुपयांपासून तर १४० रुपयांपर्यंत जातो. फक्त जव्हार तालुक्यात ८०० ते ९०० टन माल खरेदी-विक्री होतो.

आम्ही काजू बी खरेदी करतो, त्यात आम्हाला लहान-मोठ्या आकाराच्या बीचा फटकाही बसतो, मात्र वर्षानुवर्षे आम्ही काजू बी खरेदी-विक्री करीत आलोय. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा चांगला मोबदला आम्ही देतो. मात्र ऐन सीझनमध्ये लॉकडाऊन लागल्यामुळे खरेदी-विक्री थांबली आहे.- खुशील सहाणे, काजू बी व्यापारी, जव्हार