शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींना सडके तांदूळ, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 01:54 IST

Mokhada News : कोरोना महामारीमुळे रोजगार हरवलेल्या आदिम कातकरी बांधवांना तातडीची मदत म्हणून तब्बल ७ महिन्यानंतर प्रति कुटुंब २० किलोग्रॅम तांदूळ वाटप करण्याचे काम आदिवासी विकास महामंडळाने सुरू केले होते.

मोखाडा : आदिवासी विकास महामंडळाकडून आदिवासींना देण्यात येत असलेल्या सडक्या तांदळाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली असून असा तांदूळ वाटप करण्याचे तातडीने बंद करून दर्जेदार तांदूळ देण्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

कोरोना महामारीमुळे रोजगार हरवलेल्या आदिम कातकरी बांधवांना तातडीची मदत म्हणून तब्बल ७ महिन्यानंतर प्रति कुटुंब २० किलोग्रॅम तांदूळ वाटप करण्याचे काम आदिवासी विकास महामंडळाने सुरू केले होते. हे तांदूळ अत्यंत निकृष्ट आणि सडके असल्याचे श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी २० दिवसांपूर्वी शासनाच्या निदर्शनास आणले होते. हे तांदूळ २०१४-१५ वर्षातील शिल्लक तांदूळ असून त्यांची विक्री होत नसल्याने ते आदिवासींना वाटप करण्यात येत आहेत, हे अधिकाऱ्यांनी श्रमजीवीच्या आंदोलनात कबुल केले होते. याच वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना प्रत्यक्ष भेटून विवेक पंडित यांनी हे सडके तांदूळ त्यांना दाखवले होते. मात्र तरीही बुधवारी हेच तांदूळ पुन्हा पॉलिश करून वाटप करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आदिवासी विकास महामंडळ अधिकाऱ्यांचा डाव श्रमजीवी संघटनेने हाणून पाडला.रायगड जिल्ह्यातील     वाकडी आणि पालघर जिल्ह्यातील भिनार या ठिकाणी या तांदळाच्या गाड्या श्रमजीवी कार्यकर्त्यांनी पकडल्या. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पंडित आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी  भेट घेतली. 

या वेळी एका अधिकाऱ्याने आदिवासी तांदूळ घेतात, मग विरोध कशाला करता? असे सांगताच संतप्त होऊन पंडित यांनी त्या अधिकाऱ्याची चांगलीच खरडपट्टी केली. आदिवासी माणसे आहेत,जनावरे नाहीत, असे सांगत हे आम्ही खपवून घेणार नाही, असे स्पष्ट सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत तातडीने हे वाटप बंद करण्याचे आदेश दिले. 

मूलभूत प्रश्न सोडवण्याबाबत कटिबद्धश्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थान येथे भेट घेतली. श्रमजीवी शिष्टमंडळाने आदिवासींच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री ठाकरे यांचे या वेळी लक्ष वेधले. १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय स्वातंत्र्याची पंचाहत्तरी आहे, त्यापूर्वीच आदिवासींच्या किमान मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करून त्यांच्या दारात स्वातंत्र्याचा प्रकाश पोहोचवण्याबाबत कटिबद्द राहणार असल्याचे आश्वासक विधान या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

टॅग्स :palgharपालघर