शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

बोईसरमध्ये अतिक्रमणे हटविली

By admin | Updated: April 6, 2016 01:53 IST

सरावली ग्रामपंचायतीने बोईसर पोलीसांच्या सहाय्याने नवापुर नाका ते तारापूर एम.आय.डी.सी. या मुख्य व प्रचंड वाहतुकीच्या रस्त्यावरील धोडीपूजा पासून

बोईसर : सरावली ग्रामपंचायतीने बोईसर पोलीसांच्या सहाय्याने नवापुर नाका ते तारापूर एम.आय.डी.सी. या मुख्य व प्रचंड वाहतुकीच्या रस्त्यावरील धोडीपूजा पासून अवधनगर व महावीर चेंबर दरम्यानच्या अनधिकृत टपऱ्या, रस्त्यावरच पार्कींग केलेली वाहने, विक्रेते व फेरीवाल्यांना हटवून रस्ता मोकळा केला असून धडक मोहिम ही सलग राबविण्यात येणार आहे.महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने (एमआयडीसी) सुमारे सहा कोटी रू. खर्चून एमआयडीसी टाकी नाका ते बोईसर नवापूर नाक्यादरम्यान सतराशे पन्नास मिटर लांबीचा व सात व सात मीटर रूंदीचा रस्ता बांधला आहे. रस्त्याच्या मध्यभागी एक मिटरचा डिव्हायडर तर दिड-दिड मीटर रूंदीचे गटार व त्यावर फुटपाथ बांधला आहे. हा रस्ता अनेक अडचणींवर मात करून बांधण्यात आला होता.परंतु त्याचा बहुसंख्य भाग अनधिकृत टपऱ्या, वेड्यावाकड्या पद्धतीने उभी केलेली वाहने, फेरीवाले, विक्रेते यांनी व्यापल्याने चौपदरी रस्त्याचे रूपांतर एकेरी रस्त्यात झाले होते. वाहतूक खोळंबून अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली होती तर मागील महिन्यात याच रस्त्यावर एकाच वेळी दोघांचा अपघाती बळी गेला होता. अनधिकृतपणे सर्वांनी रस्ता व्यापल्याने एमआयडीसीच्या दिशेने येणाऱ्या जाणाऱ्या लाखो कामगार व वाहनचालकांना मानसिक त्रास सहन करावा लागून वेळेचाही अपव्यय होत होता.या सर्वांची गांभिर्याने दखल सरावली ग्रामपंचायतीच्या सरपंच वैभवी राऊत, उपसरपंच अशोक शाळुके, सदस्य सुरेश सहानी, शितल गोवारी, विजय राऊत, इ. नी बोईसर पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक के. एस. हेगाजे व पोलीस फोर्सच्या मदतीने क्रेनच्या सहाय्याने टपऱ्या उचलून नेल्या. त्या मोहिमेत शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख प्रभाकर राऊळ यांनीही महत्वाची भूमिका बजावली. (वार्ताहर)