वसईतील सेंट एन्स शाळेला भीषण आग; अडकलेल्या 2 शिक्षकांची सुखरुप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 16:31 IST2021-05-19T16:23:17+5:302021-05-19T16:31:49+5:30
Big Fire to School : सुदैवाने जीवितहानी नाही

वसईतील सेंट एन्स शाळेला भीषण आग; अडकलेल्या 2 शिक्षकांची सुखरुप सुटका
आशिष राणे
वसई पश्चिमेतील विद्यामंदिर मार्ग परिसरातील एका इंग्लिश कॉन्व्हेंट स्कुलला बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.सुदैवाने या आगीच्या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र या दुर्घटनेवेळी शाळेत तिसऱ्या मजल्यावर आगी प्रसंगी अडकून बसलेल्या 2 शिक्षकांची वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाने सुखरुप सुटका केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसईतील नवघर माणिकपूर शहरातील एच प्रभागात विद्यामंदिर मार्ग शेजारी सेंट एन्स कॉन्व्हेंट स्कुलची मोठी इमारत आहे.
शाळा बंद असलेल्या या इमारतीत त्यावेळी शालेय कामकाजासाठी दोन शिक्षिका तेथील तिसरा मजल्यावर काम करीत होत्या.
दरम्यान अचानकपणे या इमारतीत सकाळी 11 वाजता स्कुलच्या तळमजल्यावरील स्टोर रूम मध्ये आगीने पेट घेतला असल्याचे बाजुला असलेल्या काही रहिवासी संकुलातील नागरिकांनीं पाहताच त्यांनी तात्काळ वसईच्या सनसिटी दिवाणमान अग्निशमन दलाला कळविले. तात्काळ त्याठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत शर्तीचे प्रयन्त करत ही आग आटोक्यात आणली. मात्र, त्याचवेळी येथील तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या दोन शिक्षिकाना देखील सुखरूप खाली आणण्यात यशस्वी ही झाले. आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्यप कळु शकलं नाही.
विशेष म्हणजे शाळा बंद असल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी या आगीच्या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित अथवा यामध्ये कोणी जखमी झालेल नाही. मात्र, स्कुलची बऱ्यापैकी मालमत्ता व कागदपत्रे यांचे मोठं नुकसान झाले आहे.या संदर्भात स्कुल च्या व्यवस्थापन कमिटी शी संपर्क साधला मात्र तो झाला नाही.