धामणी धरणाचे सर्व दरवाजे उघडले; सूर्या नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 12:50 IST2021-09-13T12:49:26+5:302021-09-13T12:50:27+5:30
धरणातून 7 हजार 853 क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

धामणी धरणाचे सर्व दरवाजे उघडले; सूर्या नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- शशिकांत ठाकूर
कासा- सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाचे सर्व पाचही दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या आठवडाभरापासून झालेल्या जोरदार पावसाने धामणी धरण 100 टक्के भरले असून पाणी पातळी 118 मीटर आहे तर पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सर्व पाचही दरवाजे 41सेंमीने उघडे आहेत. त्यामुळे धरणातून 7 हजार 853 क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. तर त्या खालील कवडास बंधारा ओव्हरफ्लो झाला असून सूर्या नदीत एकूण 15 हजार 200 क्यूसेक पाणी सोडले जात असल्याने सूर्या नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कासा- सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाचे सर्व पाचही दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. pic.twitter.com/UNgcRbVaT0
— Lokmat (@MiLOKMAT) September 13, 2021