शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेसाठी ‘आप’ची चाचपणी

By admin | Updated: February 12, 2015 01:23 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आपने नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे

नवी मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आपने नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी २२ फेब्रुवारीला राज्यस्तरीय कमिटीची बैठक होणार आहे. दरम्यान, दिल्लीतील ट्रेंडचा महापालिका निवडणुकीत नक्कीच फायदा होईल, असा विश्वास आपच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचा धुव्वा उडविला. या निवडणुकीत आपला मिळालेल्या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी नवी मुंबईतील आपच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी शहरात रॅली काढून विजयोत्सव साजरा केला. एकूणच कार्यकर्त्यांत नवचैत्यन्य निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पक्षाने चाचपणी सुरू केली आहे. महापालिकेच्या निवडणुका लढण्यासंदर्भात कार्यकर्त्यांची मानसिकता तयार झाली आहे. त्यानुसार महापालिकेची निवडणूक लढण्यासंदर्भातील प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात येणार आहे. यासंदर्भात २२ फेब्रुवारीला आम आदमी पार्टीच्या राज्यस्तरीय कमिटीची बैठक असून त्यात अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पक्षाच्या महाराष्ट्र कार्यकारिणी समितीचे सदस्य सुंदर बालकृष्णन यांनी दिली. (प्रतिनिधी)