शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यात ४ ग्रामपंचायती अविरोध

By admin | Updated: April 10, 2016 00:52 IST

तालुक्यात १७ एप्रिल ७० ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यापैकी चार बिनविरोध झाल्याने ६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून ६१२ जागांसाठी १२७२ उमेदवार

वाडा : तालुक्यात १७ एप्रिल ७० ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यापैकी चार बिनविरोध झाल्याने ६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून ६१२ जागांसाठी १२७२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.सापरोंडे, कळंभे, मांडवा, आखाडा या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ६६ ग्रामपंचायतीत २१९ मतदान केंद्रे ठेवण्यात आली असून एक हजार दोनशे पन्नास कर्मचारी वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती निवासी नायब तहसिलदार विठ्ठल गोसावी यांनी दिली.बहुतांशी ग्रामपंचायतीमध्ये चुरशीच्या निवडणुका होत असून ग्रामपंचायत पातळीवर पक्षीय राजकारण खेळले जात नसले तरी राजकीय पुढारी व नेत्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे काही ग्रामपचांयती निवडणूका पक्षिय पातळीवर होतील असे चित्र दिसत आहे. भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आर.पी.आय, बहुजन विकास आघाडी या सर्वच पक्षांच्या नेत्यांची मोर्चे बांधणीला सुरूवात केली आहे.तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या निवडणुका म्हणून कुडूस, वडवली, नारे, कोणसई, जामघर, बिलोशी, कोंढले, डाकिवली, घोणसई, चिखले खानिवली या ग्रामपंचायतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कुडूस ग्रामपंचायतीत विद्यमान उपसरपंच मिलिंद चौधरी यांच्या विरोधात जव्हार अर्बन बँकेचे उपाध्यक्ष भरत जाधव, काँग्रेसचे डॉ. गिरीश चौधरी हे उभे राहीले असून गेली दहा वर्षे एकत्र निवडणुक लढलेले माजी सरपंच भगवान चौधरी व माजी उपसरपंच इरफान सुसे यांनी एकमेकांविरोधात पॅनल उभे केले असून येथे अत्यंत रंगतदार व चुरशीची निवडणूक होणार आहे तर नारे गावात आताच वातावरण तापले असून पोलीसांनी गस्त चालू केली आहे. भाजपाचे कुंदन पाटील तर दुसरे पॅनल प्रमुख सुधीर पाटील यांच्या रस्सीखेच सुरू आहे.औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या सर्वच ग्रामपंचायतीच्या निवडणुका या चुरशीच्या होणार आहेत. सत्तेत असणारे विजयी होतात की त्यांना पराभव स्वीकारावा लागतो हे येत्या १७ तारखेला दिसून येईल.कुडूस ग्रामपंचायतीत विद्यमान उपसरपंच मिलिंद चौधरी यांच्या विरोधात जव्हार अर्बन बँकेचे उपाध्यक्ष भरत जाधव, काँग्रेसचे डॉ. गिरीश चौधरी हे उभे राहीले असून गेली दहा वर्षे एकत्र निवडणुक लढलेले माजी सरपंच भगवान चौधरी व माजी उपसरपंच इरफान सुसे यांनी एकमेका- ंविरोधात पॅनल उभे केले आहे