शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

१५० वी गांधी जयंती : वारली चित्रशैलीत चितारला महात्मा गांधींचा जीवनपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 00:00 IST

१५० व्या गांधीजयंतीनिमित्त नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर येथे १ ते ८ आॅक्टोबर या काळात चित्र प्रदर्शन भरवले जाणार आहे.

- अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी : १५० व्या गांधीजयंतीनिमित्त नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर येथे १ ते ८ आॅक्टोबर या काळात चित्र प्रदर्शन भरवले जाणार आहे. या प्रदर्शनात डहाणूतील गंजाड गावाचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वारली चित्रकार अनिल वांगड यांचे महात्मा गांधीच्या जीवनपटावर आधारित वारली चित्रशैलीतील पेंटिंग लावले जाणार आहे.महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांचा जीवनप्रवास वारली पेंटिगमधून उभा करण्याचा प्रस्ताव नवी दिल्लीतील दस्तकारी हार्ट समितीकडून अनिल वांगड यांना आला. परदेशातील प्रदर्शनात व्यस्त असल्याने कमी अवधीत हे चित्र पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. याकरिता बापूंच्या जीवनावर आधारित लिखित आणि फोटोद्वारे माहिती मिळविणे आवश्यक होते. त्याकरिता त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून अशी माहिती गोळा केली. यासाठी गांधी उच्च शिक्षणाकरिता इंग्लंडला जाण्यापासून तेथील श्वेत-अश्वेत भेदाभेद, आगगाडीच्या डब्यात घडलेला अपमानास्पद प्रकार, त्यानंतर भारतात परतल्यानंतर स्वातंत्र्य प्राप्तीसाठी केलेली आंदोलने, ब्रिटिशांची दडपशाही, दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, अहिंसा, सत्य व सर्वधर्म समभावाची शिकवण, चरख्यावर सूत कातण्यापासून दैनंदिन कार्य, भारत छोडो आंदोलन ते स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंतच्या घटनांना चित्रात स्थान देण्यात आले आहे. हे चित्र ४० बाय ५४ इंच आकारातील असून ते साकारायला सात दिवसांचा अवधी लागला. त्याकामी त्यांच्या पत्नीचीही त्यांना मदत झाली. पूर्ण झालेले चित्र स्पीडपोस्टाने नवी दिल्ली येथे पाठविण्यात आले.

१ ते ८ आॅक्टोबर या काळात नवी दिल्लीतील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर येथे हे पेंटिंग प्रदर्शनात लावण्यात येणार असल्याची माहिती वांगड यांनी ‘लोकमत’ला दिली. ते जगप्रसिद्ध वारली चित्रकार पद्मश्री कै.जिव्या सोमा म्हसे यांचे शिष्य आहेत.नवी दिल्लीतील दस्तकारी हार्ट समितीतर्फे १५० व्या गांधी जयंतीनिमित्त हे वारली पेंटिंग काढण्याचा प्रस्ताव आला. त्यानंतर इंटरनेटवरून तसेच शालेय पुस्तकातून माहिती व चित्राचा अभ्यास करून वारली चित्रशैलीत हे पेंटिंग पूर्ण केले. यामध्ये त्यांच्या जीवनातील विविध घटनांचा समावेश आहे.- अनिल वांगड,वारली चित्रकार, गंजाड/डहाणू 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीIndiaभारत