शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

अनिलकुमार पवार प्रकरणात १ कोटी जप्त, ४१ बेकायदा इमारती; १२ ठिकाणी छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 11:43 IST

या संपूर्ण प्रकरणाची पुढील तपासणी अजूनही सुरू आहे. या कारवाईमुळे शहरात चर्चेला उधाण आले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : वसई-विरार शहरातील ४१ बेकायदेशीर इमारतींच्या प्रकरणी, अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानीही धाड टाकली हाेती. तसेच या घोटाळ्याचे मास्टरमाइंड बिल्डर जयेश मेहता, पवार आणि इतरांशी संबंधित मुंबई, पुणे, नाशिक आणि सटाणा येथील १२ ठिकाणांवर छापे टाकून ‘ईडी’ने १ कोटी ३३ लाख रुपये व महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. 

या प्रकरणात केवळ बिल्डर्सच नव्हे, तर तत्कालीन वसई-विरार महानगरपालिकाचे आयुक्त अनिल पवार यांच्यासह एक संपूर्ण सिंडिकेटच उघडकीस आला आहे. ‘ईडी’ने केलेल्या तपासणीत अनिल पवार यांच्या नातेवाइकांच्या नावावर असलेल्या अनेक बेनामी मालमत्तांची कागदपत्रे आणि गुन्हेगारी साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहे. यासोबतच रोख रकमेच्या आणि चेकच्या डिपॉझिट स्लिप्सही सापडल्या आहेत. या प्रकरणात यापूर्वीही ‘ईडी’ने कठोर कारवाई केली होती. 

या संपूर्ण प्रकरणाची पुढील तपासणी अजूनही सुरू आहे. या कारवाईमुळे शहरात चर्चेला उधाण आले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

‘ईडी’च्या तपासात धक्कादायक खुलासे

‘ईडी’च्या तपासणीतून समोर आलेले खुलासे अत्यंत धक्कादायक आहेत. तत्कालीन आयुक्त अनिल पवार, आयएएस हेच या संपूर्ण बेकायदेशीर कामाचे प्रमुख सूत्रधार होते. त्यांनी आयुक्त पदावर येताच प्रत्येक प्रकल्पासाठी कमिशनचे दर निश्चित केले होते. 

त्यांच्यासाठी प्रतिचौरस फूट २०-२५ रुपये आणि डीडीटीपी (उपसंचालक, नगररचना) वाय.एस. रेड्डी यांच्यासाठी १० रुपये प्रतिचौरस फूट कमिशन ठरले होते. हे लाचेचे काळे धन लपवण्यासाठी पवार यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाइकांच्या नावावर अनेक बनावट कंपन्या स्थापन केल्या होत्या. 

या कंपन्या निवासी टॉवर्स, गोदामे आणि पुनर्विकास प्रकल्पांच्या नावाखाली कार्यरत होत्या. या कंपन्यांची स्थापना पवार यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळातच झाली होती, यावरून त्यांच्या हेतूची स्पष्टता दिसून येते.

८ कोटी ९४ लाख रुपयांची रोकड जप्त.

२३.२५ कोटी रुपयांचे हिरे आणि बुलियन जप्त.

१३.८६ कोटी रुपयांचे बँक बॅलन्स व शेअर्स गोठवले होते. 

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnalasopara-acनालासोपाराEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCrime Newsगुन्हेगारी