शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर विधानसभेचे सावट

By admin | Updated: September 16, 2014 23:55 IST

येत्या २१ सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर विधानसभा निवडणुकीचे सावट पसरले आहे. जिल्हा परिषद हातून गेली तर त्याचा थेट परिणाम विधानसभा निवडणुकांवर होईल,

वर्धा : येत्या २१ सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर विधानसभा निवडणुकीचे सावट पसरले आहे. जिल्हा परिषद हातून गेली तर त्याचा थेट परिणाम विधानसभा निवडणुकांवर होईल, अशी भीती सर्वच राजकीय पक्षांना असल्यामुळे या निवडणुकीसाठीच्या हालचालींना आता वेग आला आहे. जिल्हा परिषदेवर आजतागायत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचीच सत्ता राहिली आहे. अडीच वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये पहिल्यांदा भाजपचे काँग्रेसच्या बरोबरीने म्हणजेच प्रत्येकी १७ सदस्य निवडून आले होते. जि.प. वर सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून पराकोटीच्या हालचाली झाल्या. ऐनवेळी काँग्रेसच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस धावून आली. तरीही बहुमतासाठी एका जागेची गरज होती. दुसरीकडे भाजपही सत्ता स्थापनेसाठी धडपडत होता. भाजपकडे स्वभाप ३, सेना १ आणि चार अपक्ष असे संख्याबळ झाले. अखेर तटस्थ असलेल्या गोपाल कालोकर या अपक्ष सदस्यांच्या हातात सत्तेची किल्ली आली. ते ज्या गटात बसणार त्या गटाचा अध्यक्ष अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र कालोकर हे काँग्रेसशी जुळलेले असल्यामुळे त्यांनी आघाडीसोबतच बसण्याचा निर्णय घेतला. यामुळे आघाडीला सत्ता टिकविणे शक्य झाले. आणि पर्यायाने भाजपाचे पहिल्यांदा जिल्हा परिषदेवर झेंडा फडकविण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. अडीच वर्षांनंतर पुन्हा अध्यक्षपदाच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. आघाडीतील एका सदस्याचे निधन झाल्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले आणि भाजपचे संख्याबळ एकने वाढले. अशातच स्वभापचा एक सदस्य काँग्रेस गोटाशी हातमिळवणी करुन असल्यामुळे आघाडीच्या संख्येत कुठलाही फरक पडला नाही. मात्र आता माजी खासदार दत्ता मेघे हे भाजपमध्ये आहेत. जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी त्यांनी कंबर कसल्याची माहिती आहे. त्यांचे समर्थक असलेले काँग्रेसचे काही जि.प. सदस्य त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. ते अध्यक्षपदाच्या निवडणुकीला गैरहजर राहिल्यास काँग्रेस-राकाँ आघाडीला सत्ता टिकविणे कठिण जाईल, असे बोलले जात आहे. असे झाल्यास लोकसभा जशी भाजपचे बळकावली. तशीच जिल्हा परिषदही हस्तगत केल्यास याचे पडसाद विधानसभा निवडणुकीवर होईल, अशी शक्यताही जाणकार वर्तवीत आहे. एकूणच जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक ही आघाडीतील नेत्यांसाठी प्रतिष्ठेची तर भाजप नेत्यांसाठी वर्चस्वाची ठरणार आहे. यात कोण जिंकतो, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)