शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

युवकांना मिळाला प्रचारकरूपी रोजगार

By admin | Updated: September 30, 2014 23:39 IST

सध्या राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. प्रत्यक्ष प्रचाराला प्रारंभ झाला आहे़ यामुळे कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यासाठी उमेदवारांसह पदाधिकारी कामाला लागले आहेत़

गौरव देशमुख - वायगाव (नि़)सध्या राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. प्रत्यक्ष प्रचाराला प्रारंभ झाला आहे़ यामुळे कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यासाठी उमेदवारांसह पदाधिकारी कामाला लागले आहेत़ सध्या कार्यकर्त्यांचा अभाव दिसून येत आहे़ यामुळे बेरोजगार युवकांना प्रचारकरूपी रोजगार मिळाल्याचे दिसत आहे़ यात चहा, अल्पोपहार, रात्रीचे जेवण आणि २०० ते ३०० रुपये मजुरी, असे दर ठरल्याची माहिती आहे़ निवडणुका आल्या की, बेरोजगारांच्या हाताला काम मिळते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही़ यंदा तर बेरोजगार युवक तसेच मजुरांना संधीच चालून आली आहे़ पूर्वी आघाडी व युती आणि इतर पक्ष, अपक्ष उमेदवारांचा प्रचार होत होता़ आता चार राजकीय पक्ष व अन्य उमेदवारांचा प्रचार करावयाचा असल्याने अधिक प्रचारक लागणार आहेत़ यासाठी दर ठरविण्यात आले असून सकाळी १० ते रात्री १० पर्यंत आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्याची बोली केली जात असल्याचे दिसते़ अशा प्रचारकांकडून प्रचारास प्रारंभ झाला असला तरी पक्षनिष्ठ कार्यकर्ते मात्र आजही घरच्या भाकरीवरच आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी फिरत असल्याचे दिसते़ आघाडी व युती तुटल्याने राजकीय पक्षांचे उमेदवार विलग होऊन लढत आहेत़ यामुळे प्रचारकही अधिक लागणार आहेत़ पूर्वी गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीने एखाद्या उमेदवाराच्या पारड्यात मते टाकण्याचे आदेश दिले की, संपूर्ण गाव त्या उमेदवाराला मतदान करीत होते़ त्या काळात प्रत्येक कार्यकर्ता दिवसभर श्रम घेत उमेदवारांच्या विजयासाठी झटत होते़ दिवसभर चिवडा खाऊन सायकलने गावोगावी प्रचारासाठी फिरत होते़ आता प्रचार मोहीम ही काळानुसासर बदलली आहे. या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना खूश करण्याचे काम प्रथम उमेदवारांना करावे लागते़ दररोज जर प्रचार मोहीम सांभाळायची असेल तर दोन वेळ चहा, सकाळी अल्पोपहार, रात्री जेवण व इतर काही तसेच २०० ते ३०० रुपये मजुरीही काहींना द्यावी लागते़ यातही ईमाने इतबारे काम करणारे काही कार्यकर्ते आजही दिसतात़ काही उमेदवारांनी प्रचारासाठी नातेवाईकाचा शोध सुरू केल्याचे दिसते़ निष्ठावंत कार्यकर्त्यांची कमतरता प्रत्येक उमेदवाराला जाणवत असल्याचेही चित्र आहे़