शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी रोल मॉडेल बनावे

By admin | Updated: November 18, 2016 02:20 IST

युवकांनी स्वत:च रोल मॉडेल व्हावे. विकासाच्या वाटा त्यांनी स्वत: शोधाव्या, यात वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन ध्येय निश्चित करावे

हेमचंद्र वैद्य : युवा संघटन स्थापना दिन कार्यक्रमवर्धा : युवकांनी स्वत:च रोल मॉडेल व्हावे. विकासाच्या वाटा त्यांनी स्वत: शोधाव्या, यात वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन ध्येय निश्चित करावे आणि त्या दिशेने मार्गक्रमण करावे, असे मत राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धाचे प्रचारमंत्री, डॉ. हेमचंद वैद्य यांनी व्यक्त केले. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या नेहरू युवा केंद्र यांच्यावतीने प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नेहरू युवा केंद्र संगठन स्थापना दिन कार्यक्रम घेण्यात आला. सोमवारी झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैद्य बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. हेमचंद वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बजाज फाऊंडेशनचे डॉ. अशोक मेहरे होते. तर अतिथी म्हणून समाजकार्य महाविद्यालय, चंद्रपूरचे प्रा.डॉ. सुभाष गिरडे, जिल्हा युवा समन्वयक संजय माटे, लेखापाल अनिल साखरे, दयाराम रामटेके, सतिश इंगोले, संजय अवचट यांची उपस्थिती होती. यानंतर बोलताना डॉ. अशोक मेहरे म्हणाले, युवकांनी आत्मविश्वास वृद्धींगत करून व्यक्तिमत्वाचा विकास करावा. विविध शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याचा सहकार्य करावे. एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांची भूमिका असावी. तर प्रा.डॉ. सुभाष गिरडे यांनी युवकांना एखादे गाव दत्तक घेवून ग्रामीण विकासात व युवकांच्या विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक करताना जिल्हा युवा समन्वयक संजय माटे म्हणाले, विद्यार्थी दशेत नसलेल्या ग्रामीण युवक युवतींसाठी त्यांच्या समग्र विकासासाठी नेहरू युवा केंद्र संगठन कार्य करते. यासाठी गावोगावी युवा मंडळाचे गठन केल्या जात आहे. शासकीय योजना या युवा मंडळाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य या माध्यमातून होत आहे. युवकांनी या कार्यात सहभागी होवून राष्ट्र निर्माणात योगदान द्यावे, असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन संजय अवचट यांनी तर आभार आशिष नागपुरे यांनी मानले. युवक व युवतींची उपस्थिती होती.(स्थानिक प्रतिनिधी)