शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या दिवशी गावठी दारूमुळे युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST

हनुमान पवार हा मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होता. याविषयी कुटुंबीयांनी पुलगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती. रविवारी सकाळी पारधी बेड्यापासून ५० मीटर अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, गावात एकच खळबळ उडाली. त्याचा गावठी दारूनेच मृत्यू झाल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देवायफड येथील घटना : पोलिसांचा नाकर्तेपणा; ग्रामस्थांत असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील वायफड येथे सलग दुसऱ्या दिवशी गावठी दारूने युवकाचा बळी घेतला. हनुमान नारायण पवार (४०) रा. वायफड असे मृत युवकाचे नाव आहे.हनुमान पवार हा मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होता. याविषयी कुटुंबीयांनी पुलगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती. रविवारी सकाळी पारधी बेड्यापासून ५० मीटर अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, गावात एकच खळबळ उडाली. त्याचा गावठी दारूनेच मृत्यू झाल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.वायफड येथे पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणावर दारू गाळण्यासह विक्री होते. याविषयी ग्रामस्थांकडून सातत्याने ओरड होत असताना पुलगाव पोलिसांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना येथे गावठी दारूचे अक्षरश: पाट वाहत असल्याचे चित्र आहे. यापूर्वी गावातीलस संजय भाऊराव आत्राम (४०) हा युवक २९ मे रोजी घरून निघून गेला. त्याला दारूचे प्रचंड व्यसन जडले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतलाच नाही.शनिवारी सकाळी पारधी बेड्याजवळील बाभळीच्या झाडाखाली त्याचा मृतदेह आढळून आला. ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. अति मद्य सेवनानंतर पिण्यास पाणी न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी वर्तविला.पुलगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. ही घटना ताजी असतानाच रविवारी पारधी बेड्यापासून ५० मीटर अंतरावर हनुमान पवार या युवकाचा मृतदेह आढळून आला. पुलगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास करीत आहेत. सलग दुसºया दिवशी गावठी दारूमुळे युवकाचा बळी गेल्याने गावात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये असंतोष खदखदत आहे.पावडरपासून गावठी दारूनिर्मितीवायफड येथील पारधी बेड्यावर फार मोठ्या कालावधीपासून दारूभट्ट्यांचा धूर निघतो. जीवघेण्या पावडरपासून गावठी दारूची निर्मिती केली जात असल्याचे ग्रामस्थ सांगतात.पोलीस तैनात तरीही...गावठी दारूभट्टीवर कारवाईची मागणी झाल्यानंतर काही पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. पोलस कर्मचारी सकाळी १० पासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत तैनात असतात. ते निघून जाताच दारूनिर्मिती आणि विक्रीला ऊत येतो. इतकेच नव्हे, तर पोलीस तैनात असताना पारखी बेड्याच्या मागील भागात राजरोसपणे दारूविक्री होत असल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राजकीय हस्तक्षेप येतोय कारवाईत आडदेशभरासह राज्यात कोरोना विषाणू संसर्गाने थैमान घातले आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक भयभीत आहेत. दारूमुळेच कोरोनाचे संक्रमण होऊ शकते ही बाब लक्षात घेऊन कित्येक दिवसांपासून वायफड येथील नागरिक दारूविक्रीवर अंकुश लावण्याची मागणी करीत आहेत. मात्र, पोलीस जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असून राजकीय हस्तक्षेपही दारूव्यवसायाला अभय देणारा ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या