रुचिताच्या लग्नासाठी धावून आली तरुणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 06:00 AM2019-09-25T06:00:00+5:302019-09-25T06:00:09+5:30

वरपक्षाकडील मंडळी विवाह सोहळ्याचा संपूर्ण खर्च करणार असून काही मदत उभारायची असल्याचे सांगितले. मोहित सहारे नामक तरुणाने नीता जानी यांच्याशी संपर्क करून त्यांच्यापुढे व्यथा मांडली. जानी यांनी शक्य होईल, तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले. लायन्स क्लब वर्धा ट्रस्टच्या अध्यक्ष सोनाली श्रावणे, योगीता मानकर आणि नीता जानी यांनी स्वत: भेटून आर्थिक स्वरूपात मदत केली.

The young woman came running for the wedding of interest | रुचिताच्या लग्नासाठी धावून आली तरुणाई

रुचिताच्या लग्नासाठी धावून आली तरुणाई

Next
ठळक मुद्देजोपासले सामाजिक उत्तरदायित्व : अनेकांनी रोख, साहित्य स्वरूपात केली मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : घरची हलाखीची परिस्थिती, त्यामुळे हातावर आणणे आणि पानावरच खाणे अशीच दिनचर्या. मुलगी लग्नाला आलेली; मात्र पैसा अदलाच नसल्याने लग्न कसे करायचे या पेचात असताना युवाशक्तीने संघटित होत आर्थिक मदत उभी केली. कुणी विवाहाकरिता लागणारे साहित्य मदत स्वरूपात दिले आणि अखेर रुचिताचा विवाह पार पडला.
सिंदी (मेघे) परिसरात रवी उके वास्तव्याला आहेत. त्यांच्या पत्नीचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले; रवी उके किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत. दोन बहिणींचे लग्न झाले आहे. रुचिता ही तिसऱ्या क्रमांकाची असून एक लहान भाऊ आहे. कुटुंबात कुणीच कर्ता नसल्याने रुचिताचे लग्न करण्यात अडचणी निर्माण झाल्या. याविषयी परिसरातील जय उके या तरुणाला माहिती मिळाली. त्याने इतर मित्रांना ही बाब सांगितली. वरपक्षाकडील मंडळी विवाह सोहळ्याचा संपूर्ण खर्च करणार असून काही मदत उभारायची असल्याचे सांगितले. मोहित सहारे नामक तरुणाने नीता जानी यांच्याशी संपर्क करून त्यांच्यापुढे व्यथा मांडली. जानी यांनी शक्य होईल, तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले. लायन्स क्लब वर्धा ट्रस्टच्या अध्यक्ष सोनाली श्रावणे, योगीता मानकर आणि नीता जानी यांनी स्वत: भेटून आर्थिक स्वरूपात मदत केली.
वरपक्षाकडील पाहुण्यांना लग्न स्थळी घेऊन जाण्यासाठी गाडीची गरज भेडसावत होती. तरुणांनी रवींद्र कोटंबकर यांच्याशी संपर्क करीत त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. कोटंबकर यांनी गाडी देण्यासोबतच इतर आर्थिक मदत देण्याचे कबूल केले. गाडीचा संपूर्ण खर्च त्यांनी स्वत: उचलला. मुलीची तयारी करून देण्यासाठी कुणी नव्हता. युवकांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर याविषयी मजकूर टाकला आणि मदतीचे आवाहन केले. ग्रुपमधील सदस्य हर्षाली बोरसरे, वैष्णवी सहारे आणि रेवा यांनी होकार दिला आणि मुलीची संपूर्ण लग्नाची तयारी करण्यास मदत केली.
तरुणाईने पुढाकार घेतला आणि रुचिताचा आनंदाच्या वातावरणात विवाह पार पडला. या संपूर्ण उपक्रमात मोहित सहारे, जय उके, अंकित बारंगे, पंकज गावंडे, तेजस ठाकरे, तन्मय मेश्राम यांच्यासह अनेकांनी मोलाची मदत केली. एका अत्यंत गरीब कुटुंबातील मुलीच्या आयुष्याची सुरूवात तरुणाईने पुढाकार घेत केलेल्या मदतीने झाल्याने परिसरात तरुणांचे कौतुक केले जात आहे.

Web Title: The young woman came running for the wedding of interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.