शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

खिचडीच्या नावाखाली पिवळा भात

By admin | Updated: November 22, 2014 23:07 IST

जिल्हा परिषद शाळांवरील विद्यार्थ्यांची गळती कमी व्हावी म्हणून केंद्र सरकारने मोठ्या गाजावाजा करीत सुरू केलेल्या शालेय पोषण आहाराची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. या पोषण

वाढोणा : जिल्हा परिषद शाळांवरील विद्यार्थ्यांची गळती कमी व्हावी म्हणून केंद्र सरकारने मोठ्या गाजावाजा करीत सुरू केलेल्या शालेय पोषण आहाराची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. या पोषण आहारातून बिस्किटे व अंडी आधीच गायब झाली आहे. सध्या विद्यार्थ्यांना खिचडीच्या नावाखाली पिवळा भात खाऊ घातल्या जात असल्याचे चित्र आर्वी तालुक्यात दिसत आहे.शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी यासाठी केंद्र सरकारने माध्यान्ह भोजन योजना सुरू केली. यांतर्गत विद्यार्थ्यांना भोजनात आठवड्यातून एकदा खिचडी सोबत सकस आहार दिल्या जावा, त्यात दुध, अंडी, केळी, बिस्किटे तसेच रोज खिचडी सोबत वेगवेगळ्या डाळीचा समावेश असावा, असे नमूद होते. शासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून शाळांना स्वयंपाकगृह बांधून दिले. भोजन शिजविण्यासाठी प्रती विद्यार्थी मानधनाची व्यवस्था करण्यात आली. सार्वजनिक वितरण प्रणालीनुसार शाळांना तांदुळ पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली व इतर साहित्यांसाठी मुख्याध्यापकांच्या नावे विशिष्ट रकमेची तरतुद करण्यात आली.परंतु या सर्व वस्तू खूपच कमी पहावयास मिळतात. विद्यार्थ्यांना केवळ पोषक खिचडीच्या नावाखाली पिवळा भात दिला जात असल्याचे दिसत आहे. त्यात दाळ हा पदार्थ अतिशय कमी असल्याचे दिसून येते. याकडे शिक्षण विभागाचे व शालेय व्यवस्थापन समितीचे याकडे दुर्लक्ष होत आहे. हा पिवळा भात खाण्याचा आता विद्यार्थ्यांनाही कंटाळा आला असूनते देखील या भाताकडे आता नाक मुरडत आहे. या खिचडीत दररोज वेगवेगळ्या भाज्या आणि दाळी असणे अनिवार्य आहे. पण तसे कुठेच दिसत नाही. तसेच हे अन्न शिजवित असलेल्या महिलांनाही अत्यल्य मानधन दिले जात असल्याचे महिला सांगत असून पोषण आहार शिजविण्याचे कंत्राट घेतलेल्या अनेक बचत गटांनी आता हे काम सोडून दिले आहे. त्यामुळेही अडचण येत आहे.(वार्ताहर)