शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

यंदा गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचे लागवड क्षेत्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 05:00 IST

खरीपात तोंडचा घास पडल्यानंतर सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांची रबी पिकांवर भिस्त असते. यंदा खरीपाच्या सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. तर नंतर झालेल्या पावसामुळे पिकाची बऱ्यापैकी वाढ झाली. यंदा समाधानकारक उत्पन्न होईल अशी आशा असतानाच जिल्ह्यात सततच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागला.

ठळक मुद्दे७० हजार २१० हेक्टरवर रबीचा पेरा

  लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : यंदा खरीपात सोयाबीन उत्पादकांचे सततच्या पावसाने तर कपाशी उत्पादकांचे गुलाबी बोंडअळीने कंबर्डे मोडल्याने सिंचनाची सोय असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रबी पिकांवर भिस्त आहे. याच पार्श्वभूमीवर सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी यंदा एकूण ७० हजार २१०.८० हेक्टरवर रबी पिकांची लागवड केली आहे. यंदा गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचे लागवड क्षेत्र वाढल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.खरीपात तोंडचा घास पडल्यानंतर सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांची रबी पिकांवर भिस्त असते. यंदा खरीपाच्या सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. तर नंतर झालेल्या पावसामुळे पिकाची बऱ्यापैकी वाढ झाली. यंदा समाधानकारक उत्पन्न होईल अशी आशा असतानाच जिल्ह्यात सततच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागला. तर याच सततच्या पावसादरम्यान गुलाबी बोंडअळीने डोकेवर काढून नुकसानीची पातळी गाठल्याने कापसाच्या उत्पादनात घट आली. असे असले तरी या आर्थिक नुकसानीला न जुमानता सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी यंदा रबी पिकांची लागवड केली आहे. जिल्ह्यात रबीचे सरासरी क्षेत्र ४७ हजार ६१९.६५ हेक्टर असताना तब्बल ७०,२१०.८० हेक्टरवर विविध पिकांची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.वेळीच मार्गदर्शन केल्यास शंकांचे होणार समाधानसध्या गहू, चणा व इतर रबी पिकांची स्थिती समाधानकारक आहे. पण ढगाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण कायम आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून वेळोवेळी मार्गदर्शन केल्यास शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान होईल.

 

टॅग्स :agricultureशेती