शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

नाचणगाव नाका ते पंचधारा रस्त्याचे काम थंडबस्त्यात

By admin | Updated: June 11, 2016 02:27 IST

शहरातून जाणाऱ्या हैदराबाद भोपाळ महामार्गास जोडणाऱ्या नाचणगाव नाका ते पंचधारा रोड या मार्गाच्या रूंदीकरणाचे काम दोन महिन्यांपूर्वी सुरू झाले होते.

खोदकाम अर्धवट : रात्रीला अपघाताचा धोकापुलगाव : शहरातून जाणाऱ्या हैदराबाद भोपाळ महामार्गास जोडणाऱ्या नाचणगाव नाका ते पंचधारा रोड या मार्गाच्या रूंदीकरणाचे काम दोन महिन्यांपूर्वी सुरू झाले होते. पण ६ ते ७ फुट रूंद व लांबलचक केलेले खोदकाम गत महिन्यापासून बंदच आहे. पावसाळा सुरू होण्यावर असल्याने या खड्यात पाणी साचून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधीत विभागाने रूंदीकरणाचे काम पूर्ववत सुरू करावे अशी मागणी व्यक्त होत आहे. शहरातून जाणारा हैदराबाद भोपाळ मार्ग मुंबई हावडा या रेल्वे मार्गावरून जातो. पण रेल्वेफाटक तासनतास बंद राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. ती टाळण्यासाठी या रेल्वे क्रासिंगवर उडाण पुलाची मंजूरी मिळाली. सदर काम लवकरच सुरू होणार असल्याचेही खा. तडस यांनी सांगितले होते. या उड्डाण पुलाकडून येणारा मार्ग मुंबई-नागपूर या द्रुतगती मार्गाला जोडून तसेच पंचधारा रोडने वाहतूक वळविण्याच्या दृष्टीने नाचणगाव नाका ते द्रुतगती मार्गापर्यंत रूंदीकरणाचे कामही दोन महिन्यापूर्वी सुरू झाले. सदर काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते. ज्या कंत्राटदाराला काम देण्यात आले त्याने रस्त्याच्या रूंदीकरणाचे कामही सुरू केले. हे कंत्राट भागीदारामध्ये होते. पण या दोघांत वाद झाल्यामुळे काम रेंगाळल्याची चर्चा आहे.द्रुतगती मार्गाकडून शहरात येणाऱ्या वाहनांची या मार्गावर वर्दळ असते. रात्री या मार्गावर फारशी प्रकाश व्यवस्था नसल्यामुळे सुरू असलेल्या या मार्गाच्या रूंदीकरणाच्या अर्धवट कामामुळे अपघाताची शक्यता वर्तविल्या जात आहे. शिवाय डांबरी रस्त्यालगतच सुरू असलेल्या एक ते दीड फूट खोलगट भागात वाहन घसरण्याची शक्यता आहे. शिवाय काम सुरू असल्याची कुठलीही सूचना लिहिलेली नाही. रात्रीला खोदकाम दिसून येत नाही. त्यामुळे सदर रस्ता रूंदीकरणाचे काम त्वरीत सुरू करावे अशी मागणी प्रवासी व्यक्त करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)