शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

महिला ग्रामसभा फक्त कागदोपत्रीच

By admin | Updated: June 4, 2014 00:14 IST

ग्रामपंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामसभेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यामुळे ग्राम सभेमध्ये जे निर्णय घेण्यात येतात ते मान्य करून गावाचा विकास साधला जातो व ग्रामसभेने घेतलेले निर्णय

वायगाव (नि.) : ग्रामपंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामसभेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यामुळे ग्राम सभेमध्ये जे निर्णय घेण्यात येतात ते मान्य करून गावाचा विकास साधला जातो व ग्रामसभेने घेतलेले निर्णय मंजुरही करावे लागतात. मुख्य ग्रामसभेपूर्वी महिला ग्रामसभा घेणे कायद्याने बंधनकारक आहे. एवढेच नाही तर ग्रामसभेमध्ये महिलांची उपस्थिती व सहभाग असणे आवश्यक आहे., असे असले तरी यासभा जिल्ह्यात होत नसल्याचे चित्र आहे. महिलांच्या महत्त्वाच्या समस्येवर व प्रश्नावर महिला ग्रामसभेत चर्चा करण्यात येते; मात्र येथील ग्राम पंचायतीमध्ये महिला ग्रामसभा फक्त कागदावर दाखविण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहे. याकडे जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्याच्या युगात बहुतांश क्षेत्रात महिला या पुरूषाच्या बरोबरीने काम  करीत आहेत. शिक्षण, राजकारण, नोकरी, व्यवसाय या क्षेत्रात महिलांना ५0 टक्के आरक्षण देण्यात आले. असे असताना केवळ आरक्षण महत्त्वाचे नसून महिलांना स्वत: निर्णय घेण्याचे व स्वत:चे विचार माडण्याचे काम या महिलांना ग्रामसभेतून करण्याची संधी दिल्या गेली आहे व जे काही त्यांचे प्रश्न आहे ते महिला ग्रामसभेत ठेऊ शकतात. महिलाच्या ग्रामसभेत जे निर्णय घेण्यात येतात ते मंजुरीसाठी ग्रामसभेत ठेवण्यात येतात. त्यांच्या हितासाठी जी काही कामे करावयाची असतील ती ग्रामसभेत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार  मान्यता देवून याद्वारे महिलांना कार्य  करण्याची संधी प्राप्त होते; परंतु ग्रामविकासाच्या कामांत महिलांना मागे ठेवण्यात येत आहे.(वार्ताहर)