शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरातच सिमेंट बंधाऱ्याला तडा

By admin | Updated: August 26, 2015 02:13 IST

तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नाला विस्तारीकरण व खोलीकरण करण्यात आले.

जलयुक्त शिवार योजना : निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा शेतकऱ्याचा आरोपरूपेश मस्के  कारंजा (घा.)तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नाला विस्तारीकरण व खोलीकरण करण्यात आले. त्यावर सिमेंट बांध बांधण्याची कामे करण्यात आली; पण यातील बहुतांश कामे निकृष्ट दर्जाची झालीत. यामुळेच एक महिन्याच्या आतच बंधाऱ्यांना तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. या कामांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.जलयुक्त शिवार अभियानात तालुक्यात बऱ्याच ठिकाणी केवळ खोदकाम करून निधीची उचल करण्यात आली. नाला विस्तारीकरण व शिवारातील पाणी शिवारात अडविणार असल्याने शिवार जलयुक्त होणे, शिवारातील विहिरींच्या जलस्त्रोतात वाढ होणे अपेक्षित होते; पण तसे झाले नाही. शिवारातील शेतात बंधाऱ्याचे पाणी शिरल्याने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येते. तालुक्यातील उमरी या गावात बारंगे यांचे शेत आहे. त्यांच्या शेताला लागून जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नाला खोलीकरण व सिमेंट बंधारा बांधण्यात आला. या सिमेंट बंधाऱ्याला लगेच तडे गेले आहेत. तांत्रिकदृष्ट्या याचे बांधकाम न झाल्याने बारंगे यांच्याा शेतात बंधाऱ्याचे पाणी शिरले. यामुळे संपूर्ण शेत खरडून गेले असून त्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानाला निकृष्ट दर्जाचे व तांत्रिकदृष्ट्या अयोग्य झालेले काम पर्यायाने कृषी विभाग जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत नुकसान भरपाई द्यावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.योग्यरीत्या खोदकाम न केल्याने शेती गेली खरडूनशिवाय जलयुक्त करणे, मृत जलस्त्रोत पुनर्जीवित करणे व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी या उद्देशाने शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले. वर्धा जिल्ह्यातही या योजनेंतर्गत कामे सुरू झाली. काही ठिकाणी योग्य कामे होत असली तरी कारंजा तालुक्यात निकृष्ट कामे झाल्याचे दिसून येत आहे. योग्यरित्या खोदकाम व बांधकाम न केल्याने उमरी येथील शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. शेतीच खरडून निघाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या संपूर्ण कामांची चौकशी करून कारवाई करणे गरजेचे झाले आहे.