शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सहायकांचा सल्ला मिळेल का?

By admin | Updated: June 4, 2014 23:58 IST

शेतकर्‍यांना शेतीविषयक सल्ला देण्यासह शासनाच्या योजनांची माहिती शेतकर्‍यांना मिळावी, शासकीय योजना राबविल्या जाव्यात यासाठी कृषी विभागाकडून कृषी सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे.

शेतकरी बांधवांचा सवाल : कर्मचारी असतात बेपत्तावर्धा : शेतकर्‍यांना शेतीविषयक सल्ला देण्यासह शासनाच्या योजनांची माहिती शेतकर्‍यांना मिळावी, शासकीय योजना राबविल्या जाव्यात यासाठी कृषी विभागाकडून कृषी सहायकांची नेमणूक करण्यात  आली आहे. मात्र अनेक कृषी सहाय्यक  गावात जातच नसल्याने शेतकर्‍यांना सल्ला मिळत नाही. यामुळे शेतकर्‍यांची फजिती होत आहे.कृषी विभाग व शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कृषी सहायकांकडे  पाहिले जाते.  ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना शेती विषयक सल्ला मिळावा, शासनाच्या योजनांची माहिती मिळावी तसेच शासनाकडून राबविण्यात येणार्‍या योजना योग्यप्रकारे राबविल्या जात आहेत का, या पाहणीसह  इतर उद्देशाने  कृषी विभागाकडून कृषी सहाय्यकांची नियुक्ती  करण्यात आली आहे. या कृषी सहाय्यकांची नेमणूक  कृषी विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. कृषी सहायकांनी ठरवून दिलेल्या  गावांमध्ये  राहणे  बंधनकारक करण्यात आले आहे.  शेतकर्‍यांच्या गाठीभेटी घेणे, त्यांना  शेतीविषयक मार्गदर्शन करणे,  शासनाच्या योजनांची माहिती देणे  असा या मागचा उद्देश  असला तरी  कृषी सहायक मात्र आठवड्यातून  एकदाच ठरवून दिलेल्या गावात जात असल्याचे  सामान्य नागरिकांचे म्हणणे  आहे. यामुळे  शेतकर्‍यांना  वेळेवर  सल्ला व मार्गदर्शन मिळत नाही. अनेक कृषी साहाय्यक मुख्यालयी न राहता इतरत्रच राहतात. ते आठवड्यातून  एखादेवळी  गावात  जातात व ठराविक  शेतकर्‍यांच्याच  भेटी घेतात. यामुळे  इतर शेतकर्‍यांना  मार्गदर्शन हवे असेल तर त्यांना कृषी सहाय्यक शोधावा लागतो.याकरिता संबंधित प्रशासनाने लक्ष देत त्वरित कारवाई करणे गरजेचे झाले आहे. कारण पेरणीचा हंगाम काही दिवसांवर असताना कृषी सहायक बेपता राहतात. यामुळे काय काळजी घ्यावी याची माहिती शेतकरी बांधवांना मिळत नाही. याकडे लक्ष देणे गरजेचे ठरत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)