शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी परिसरात पाण्याचे डबके

By admin | Updated: August 10, 2015 01:44 IST

कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव हा मुलांवर लवकर होत असतो. त्यामुळे शाळा, अंगणवाडी परिसर स्वच्छ असणे गरजेचे असते.

बालकांचे आरोग्य धोक्यात : माहिती देऊनही ग्रामपंचायतीची डोळेझाकवायगाव (नि.) : कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव हा मुलांवर लवकर होत असतो. त्यामुळे शाळा, अंगणवाडी परिसर स्वच्छ असणे गरजेचे असते. परंतु वायगाव(नि.) येथील वॉर्ड क्र. ८ मधील अंगणवाडी केंद्र क्र. ९३ च्या समोर पूर्र्णत घाण साचली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके साचले आहे. यामुळे बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या अंगणवाडीत जवळपास ३० विद्यार्थी आहेत. अंगणवाडी भोवताल सध्या पाण्याचे तळे साचले आहे. तसेच सभोवताल मोठे गवतही वाढले आहे. परिसरातील ग्रामस्थ त्याच कडेला शेणखत टाकत असतात. शेणखत व साचलेले पाणी त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. डासाचा प्रादुर्भावही वाढलेला आहे. अंगणवाडीत येत असलेली बालके ही पाच वर्षांच्या आतील आहेत. सदर बालके या साचलेल्या पाण्याची खेळत असतात. अशावेळी घाण पाण्यातील व गवतातील किडे चावून या बालकांना त्वचेचे आजार बळावण्याची दाट शक्यता आहे. सोबतच सरपटणाऱ्या प्राण्यांचीही भीती आहे. या अंगणवाडी परिसरात साचलेले पाणी, घाण, गवत तसेच शेणाचे ढिगारे स्वच्छ करण्यासंदर्भात येथील अंगणवाडी सेविका शबाना खान व मदतनिस यांनी ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी केल्या. मात्र याकडे संबंधितांनी वारंवार दुर्लक्ष केले. त्यामुळे मुलांच्या आरोग्याला धोका हा वाढला आहे. तसेच ग्राम पंचायतीच्या सौदर्यीकरणाचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्राम पंचायतीने विशेष लक्ष देवून हा परिसर स्वच्छ करावा अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)परिसरावर अवकळाअंगणवाडी समोरच पाण्याचे डबके साचले आहे. तसेच गवताचे वनही तयार झाले झाले. लहान मुले या पाण्यात व गवतात खेळत असतात. खेळताना पाण्यातील व गवतातील कीडे चावून लहान मुलांना त्वचेचे आजार, तसेच इन्फेक्शन होण्याचा धोका आहे. गवतामुळे येथे सरपटणारे प्राणीही वावरतात. याचा मुलांना धोका होऊ शकतो. अंगणवाडी परिसर स्वच्छ आणि सुंदर असणे गरजेचे असतानाही येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या परिसरात घाण टाकत असलेल्यांना मज्जाव करून त्याच्यावर कारवाई करावी व साचलेल्या पाणी नालीत प्रवाहित होण्याची व्यवस्था करण्याची गरज व्यक्त होत आहे.