जिल्ह्यातील आठ कोरड्या लघुप्रकल्पात पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 05:00 AM2020-07-05T05:00:00+5:302020-07-05T05:00:20+5:30

जून महिन्याच्या सुरुवातीला ११ मोठे मध्यम प्रकल्पांमध्ये ४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता तर ६ प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली होती. तर २० लघू प्रकल्पांपैकी आठ प्रकल्प कोरडेठाक पडले होते. जून महिन्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. एक जून ते आतापर्यंत १९४.४७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. परिणामी, मध्यम व लघुप्रकल्पांत पाणीसाठा होण्यास सुरुवात झाली आहे.

Water storage in eight dry small scale projects in the district | जिल्ह्यातील आठ कोरड्या लघुप्रकल्पात पाणीसाठा

जिल्ह्यातील आठ कोरड्या लघुप्रकल्पात पाणीसाठा

Next
ठळक मुद्देअनेक गावांना दिलासा। उपयुक्त जलसाठ्यातही झाली वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील २० लघुप्रकल्पांपैकी आठ लघुप्रकल्प जून महिन्याच्या सुरुवातील कोरडेठाक पडले होते. मात्र, जून महिन्यात दमदार पाऊस झाल्याने त्या आठही लघुप्रकल्पांमध्ये जलसाठा झाला आहे. दरम्यान जून महिन्यांतील पावसामुळ मध्यम व लघुप्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठ्यातही वाढ जाली आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला ११ मोठे मध्यम प्रकल्पांमध्ये ४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता तर ६ प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली होती. तर २० लघू प्रकल्पांपैकी आठ प्रकल्प कोरडेठाक पडले होते. जून महिन्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. एक जून ते आतापर्यंत १९४.४७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. परिणामी, मध्यम व लघुप्रकल्पांत पाणीसाठा होण्यास सुरुवात झाली आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला कोरड पडलेल्या आठ लघुप्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला आहे. तर १४ लघुप्रकल्प २६ ते ४० टक्के भरले आहेत. दरम्यान जूनच्या पावसामुळे २० लघुप्रकल्पांत ३२.७३ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर ११ मोठ्या मध्यम प्रकल्पांमध्ये ५० टक्के पाणीसाठा झाला आहे.
जिल्ह्यातील मोठे मध्यम प्रकल्प असलेल्या बोर प्रकल्पात आजघडीला ४२.६९३ टक्के, निम्न वर्धा प्रकल्पात ६३.४१६ टक्के, धाम प्रकल्पात ४० टक्के, पंचधारा ३१.५४३ टक्के, मदन प्रकल्प ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. जर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिला तर जिल्ह्यात २० लघुप्रकल्प आणि ११ मोठे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतील, अशी आशा आहे.

दमदार पावसाने समाधान
मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह नागरिक चातकासारखी पावसाची वाट पाहू लागले होते. पण दोन दिवसांपूर्वी ग्रामीण भागात झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये समाधान दिसून आले. अनेक शेतकºयांनी शेतात पेरणी केली होती. पाऊसच नसल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. पाऊस पडल्याने अखेर शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Water storage in eight dry small scale projects in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण