शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
7
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
10
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
11
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
12
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
13
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
14
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
15
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
16
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
17
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
18
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
19
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
20
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाणी प्रश्न व अवैध दारूने गाजली ग्रामसभा

By admin | Updated: May 13, 2017 01:12 IST

ग्रामपंचायतीची विशेष तहकुब ग्रामसभा गुरुवारी ग्रामपंचायतीच्या मैदानावर पार पडली.

पोलिसांचा बंदोबस्त : सरपंच-सदस्यात रोजंदारी कर्मचाऱ्यावरून उफाळला वाद लोकमत न्यूज नेटवर्क गिरड: ग्रामपंचायतीची विशेष तहकुब ग्रामसभा गुरुवारी ग्रामपंचायतीच्या मैदानावर पार पडली. ही सभा गावात असलेली पाणी टंचाई आणि अवैध दारूविक्रीने चांगलीच गाजली. शिवाय या सभेत सरपंच आणि सदस्यात रोजंदारीच्या कर्मचाऱ्यावरून वाद उफाळल्याने या वादात पोहोचला. एकूण विविध विषयांवर झालेल्या चर्चेअंती ही सभा वादाचीच ठरली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच चंदा कांबळे तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य डॉ. महेश गौर तर पं.स. सदस्य शेख ईस्त्राईल उपस्थित होते. प्रारंभी सभेचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे यांनी केले. यानंतर वॉर्ड क्रमांक २ च्या सदस्या अंधीनी दाभणे यांनी व सदस्य हमीद पटेल यांनी रोजंदारी कर्मचाऱ्याच्या मुद्द्याला हात घातला. त्यांनी हा कर्मचारी सदस्यांशी असभ्य वागणूक करीत असून त्यांना सदस्याना धमकी देतो, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर सरपंच व महिला सदस्यात वाद झाला. यानंतर १० दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने जनतेने सरपंचासह प्रशासनाला धारेवर धरले. तसेच गावात सर्वत्र अवैध दारू विक्रीला उधान आल्याचे सांगून महिला बचत गटाच्या विजया तेलरांधे व गुरूदेव सेवा मंडळाचे बबन दाभणे यांनी दारू बंदीचा मुद्दा उचलला. सदर ग्रामसभा चोख पोलीस बंदोबस्तात झाली. या सभेत प्रभाकर चामचोर, प्रमोद दाभणे, रहीम शेख, फकीरा खडसे, हमीद पटेल, रिंकु दुबे, पुंडलिक सहारे, प्रभाकर डंभारे, राजू चामचोर, किशोर डडमल यांनी सहभाग घेतला. उपस्थितांचे आभार चंदु पंढरे यांनी मानले.