शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरण योजना रखडली

By admin | Updated: January 13, 2016 02:47 IST

राष्ट्रीय पेय जलयोजनेंतर्गत २००८-०९ मध्ये मंजूर जलशुद्धीकरण योजना अद्यापही पूर्ण झाली नाही. यामुळे पवनारकरांना शुद्ध पाण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.

सहा वर्षांपासून योजना रखडली : पाईपलाईनचे काम खासगी प्लॉटमधूनपवनार : राष्ट्रीय पेय जलयोजनेंतर्गत २००८-०९ मध्ये मंजूर जलशुद्धीकरण योजना अद्यापही पूर्ण झाली नाही. यामुळे पवनारकरांना शुद्ध पाण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. येथील नागरिकांना आणखी किती दिवस शुद्ध पाण्याची प्रतीक्षा करावी लागणार, असा संतप्त सवाल, उपस्थित केला जात आहे. येथे १ कोटी ८३ लाख रुपयांची योजना कित्येक दिवसांपासून शेवटच्या टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. विहीर, टाकी व जलशुद्धीकरण केंद्राचे बांधकाम जवळपास पूर्ण झाल्याचे दिसून येते; पण पाणी पुरवठ्याची गावातील जुनी लाईन खराब झाली आहे. यामुळे नवीन पाईपलाईन टाकणे गरजेचे आहे. या कामास विलंब होत असल्याचे कंत्राटदाराने सांगितले. पाईपलाईनचा नकाशा तपासला असता नवीन ले-आऊटमधील प्लॉट धारकांच्या जागेत असल्याचे निदर्शनात आले. यामुळे सरपंच गांडोळे यांनी सदर प्लॉटमधून गेलेली पाईपलाईन काढून नवीन योग्य ठिकाणाहून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्यक्षात पाईपलाईन नकाशा मंजूर करताना या बाबी लक्षात घेणे गरजेचे होते; पण तत्कालीन प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. या प्रकारामुळे योजनेच्या पूर्णत्वास विलंब होत असल्याचे सांगण्यात येते. शिवाय कामही अत्यंत संथगतीने सुरू आहे. योजनेचे काम असेच सुरू राहिल्यास आणखी एक वर्ष नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार नाही, अशीच शक्यता वर्तविली जात आहे. सध्या येथे कार्यरत जल शुद्धीकरण केंद्र हे क्षमतेने लहान असून यंत्राचीही कार्यक्षमता कमी झाली आहे. परिणामी, नागरिकांना पुर्णत: शुद्ध पाणी मिळत नाही. पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटी, ब्लिचिंग व वीज बिलाचा अतिरिक्त भार ग्रामपंचायत प्रशासनाला सहन करावा लागत आहे. नवीन जलशुद्धीकरण केंद्र लवकर सुरू झाल्यास मोठी बचत होऊ शकते. सध्या नागरिकांना विंधन विहिरीवरून पिण्याचे पाणी घ्यावे लागत आहे. विंधन विहिरीच्या पाण्याचे नमूने तपासले असता टीडीएस ५०० च्या वर असल्याचे समोर आले आहे. यावरून विंधन विहिरीचे पाणी शुद्ध असले तरी पिण्यास अपायकारक असल्याचे सिद्ध होते. याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(वार्ताहर)