शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाचा भरणा करूनही जप्तीचा वारंट

By admin | Updated: January 11, 2016 02:01 IST

बँकेच्या कर्जाचा भरणा करूनही संबंधितावर जप्तीचा वारंट बजावला. तसेच लोक न्यायालयात हजर राहण्याचे फर्मान काढण्याचा प्रताप येथील स्टेट बँकेने केला.

ग्राहकाला मनस्ताप : स्टेट बँकेचा प्रतापदेवळी : बँकेच्या कर्जाचा भरणा करूनही संबंधितावर जप्तीचा वारंट बजावला. तसेच लोक न्यायालयात हजर राहण्याचे फर्मान काढण्याचा प्रताप येथील स्टेट बँकेने केला. यामुळे बँक व्यवस्थापनाने मानसिक छळ केल्याचा आरोप सदर शेतकऱ्याने केला आहे. शाखा प्रबंधकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.नजीकच्या ईसापूर येथील अनिल नामदेव निखाडे या सुशिक्षित बेरोजगाराने व्यवसायासाठी देवळीच्या स्टेट बँक शाखेतून ६१ हजाराचे कर्ज घेतले. कर्जाच्या रकमेतून त्याने पेप्सी बनविण्याचा लघुउद्योग सुरू केला. या दरम्यान ग्रामीण भागातील सततचे भारनियमन व इतर कारणांमुळे हा व्यवसाय अल्पावधीत बंद पडला. उत्पन्नाचे साधनच बंद पडल्यामुळे बँकेच्या कर्जाचे हप्ते कसे भरावे ही विवंचना होती. अनिलने यादरम्यान बँक अधिकाऱ्यांना भेटून स्वत:ची आर्थिक बाजू सांगितली. बँकेने सुद्धा सहमती दर्शवून अनिल सोबत आपसी समझोता केला. कर्ज स्वरूपात उचलेल्या ६१ हजाराचे ७० हजार रुपये दोन टप्प्यात देण्याचे ठरले. पहिल्या टप्प्यातील ३५ हजार २१ फेब्रुवारी २०१२ रोजी व उर्वरित ३५ हजाराचा भरणा १९ मार्च २०१२ रोजी केला. बँक अधिकाऱ्यांच्या लिखित समझोत्यानुसार हा व्यवहार करण्यात आला. पण काही कालावधीतच पुन्हा पैसे भरण्याचा तगादा बँकेकडून लावण्यात आला. जप्तीची नोटीस बजावून लोकन्यायालयात हजर राहण्याचे फर्मानही काढण्यात आले. त्यामुळे बँकेच्या अव्यवस्थेबाबत निखाडे याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वरिष्ठांनी संबंधितास समज देण्याची मागणी होत आहे.