शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

ई-संजीवनीवर वैद्यकीय सल्ला मागण्यात वर्धेकर राज्यात तिसऱ्या स्थानी,  कोविड-नॉन कोविड विषयात सांगतात औषधोपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 18:41 IST

कोविड काळात प्रत्येक गरजूला वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला मिळावा या हेतूने शासनाने ई-संजीवनी ॲप व संकेतस्थळ सुरू केले आहे. याच ॲप आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ला मिळविण्यात वर्धेकर राज्यात तिसऱ्या स्थानी आहेत.

वर्धा : कोविड काळात प्रत्येक गरजूला वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला मिळावा या हेतूने शासनाने ई-संजीवनी ॲप व संकेतस्थळ सुरू केले आहे. याच ॲप आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ला मिळविण्यात वर्धेकर राज्यात तिसऱ्या स्थानी आहेत. ऑनलाईन पद्धतीचा वापर करून आवश्यक कार्यवाही पूर्ण केल्यावर कोविड-नॉन कोविड विषयात अगदी सोप्या शब्दात रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांना वेळीच मार्गदर्शनासह औषधोपचार सांगितल्या जात आहे. त्यामुळे शासनाचा हा उपक्रम गरजू आणि गरिबांसाठी उपयुक्त ठरत आहे.कोरोना काळात संचारबंदीमुळे अनेक रुग्णांना रुग्णालयात जाणे शक्य होत नसल्यामुळे केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून गरजू आणि गरिबांना वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा योग्य सल्ला मिळावा म्हणून ई-संजीवनी ॲप आणि संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.  या संकेतस्थळावर आवश्यक माहिती भरल्यावर रुग्णाविषयी आवश्यक अहवाल सादर केल्यावर तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांना वैद्यकीय सल्ल्यासाठी वेळ देतात. याच वेळात तज्ज्ञ डॉक्टर कोविड बाधितांसह इतर आजारांच्या रुग्णांना रुग्णाने सादर केलेल्या अहवालांचे अवलोकन करून त्याला औषधोपचार, शस्त्रक्रिया आदी विषयीचा सल्ला देतात.जिल्ह्यात यासाठी १५५ उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १९४ डॉक्टरांची नोंदणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व डॉक्टरांशी ऑनलाईन संवाद साधून उपचार सांगितला जातो. या संकेतस्थळाचा वापर करून एप्रिल महिन्यापर्यंत ५०३१ वर्धेकरांनी ऑनलाईन वैद्यकीय मार्गदर्शन घेतले आहे. कोरोनाच्या काळात रुग्णालयात गर्दीत ताटकळत बसण्यापेक्षा तज्ज्ञांचे ऑनलाईन मार्गदर्शन घेऊन आजारांवर उपचार घेण्यास वर्धेकरांनी पसंती दिली आहे.

टॅग्स :Healthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्र