शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा न.प. उपाध्यक्ष व बाजार समिती सभापतीचा सोमवारी फैसला

By admin | Updated: September 26, 2016 02:10 IST

येथील नगर परिषदेचे उपाध्यक्ष कमल कुलधरीया व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर यांच्यावर आलेल्या

अविश्वासावर बैठक : वर्धेकरांचे लक्ष वर्धा : येथील नगर परिषदेचे उपाध्यक्ष कमल कुलधरीया व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर यांच्यावर आलेल्या अविश्वासावर शिक्कामोर्तब करण्यासंदर्भात सोमवारी दोनही ठिकाणी सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. या सभेत दोन्ही पदाधिकाऱ्यांवर अविश्वास पारित होतो अथवा तो बारगळतो याकडे वर्धेकरांचे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या सभांमुळे वर्धेत सोमवार अविश्वास ‘वार’ ठरण्याची चर्चा जोरात आहे. वर्धा नगर परिषदेचे उपाध्यक्ष कमल कुलधरीया पालिकेत एकाधिकारशाही राबवित असल्याने विकास कामांना अडसर ठरत असल्याचा आरोप करीत इतर सदस्यांनी एकत्र येत त्यांच्यावर अविश्वास आणला. यात पालिकेतील ३९ पैकी २६ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्याबाजूने आपले मत दिल्याची माहिती आहे. तो ठराव त्यांनी नगराध्यक्षाकडे सादर केला आहे. या अविश्वास ठरावावर सोमवारी पालिकेत सभा आयोजित आहे. या सभेत त्यांच्यावर अविश्वास पारीत होतो अथवा तो बारगळतो याकडे वर्धेकरांचे लक्ष लागले आहे.सोबतच अविश्वासाच्या कारणाने सध्या चर्चेत असलेल्या वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे श्याम कार्लेकर यांनी पक्षाचा आदेश धुडकावत बंडखोरी करून सभापतीपद बळकावले. या निवडणुकीत पक्षाशी एकनिष्ठतेच्या कारणातून अविश्वास ठराव आणण्यात आला. या ठरावाच्या बाजूने एकूण १३ सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यावरही सोमवारी बैठक होणार आहे. या बैठकीत कोणता सदस्य बंडखोराच्या बाजून आहे व कोणता सदस्य पक्षाच्या बाजूने आहे हे कळणे कठीण झाले आहे. सभापती आपले पद कायम राखण्याकरिता काही सदस्यांना घेवून ‘आऊट आॅफ कव्हरेज’ आहेत. यामुळे या सभेत नेमके काय होईल, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. दोन्ही प्रकारणात होणाऱ्या निर्णयाकडे वर्धेकरांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी) पालिकेचे पाच सदस्य ‘आऊट आॅफ कव्हरेज’ पालिकेतील पाच सदस्य आऊट कव्हरेज आहे. या सदस्यांना घेवून प्रदीपसिंह ठाकूर बेपत्ता असल्याची माहिती आहे. यात काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचे दोन व बसपाचा एक असे पाच सदस्य असल्याची माहिती आहे. या संदर्भात ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता पालिकेत उपाध्यक्षावर येत असलेला अविश्वास ठराव हा ‘फ्लॉप शो’ ठरणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अविश्वास आणणारे सदस्य सहलीवर अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यात पुढकार घेणारे सदस्य रविवारी सायंकाळी अज्ञातस्थळी सहलीवर रवाना झाले असून ते सर्व सोमवारी सकाळी सभेच्यावेळीच उपस्थित होणार असल्याची माहिती आहे. अविश्वास आणणाऱ्या सदस्यांवर कुठलाही दबाव येऊ नये याकरिता ही सहल असल्याचे बोलले जात आहे.