शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरापासून शेतकऱ्यांना चुकाऱ्याची प्रतीक्षा

By admin | Updated: January 11, 2016 02:02 IST

वर्षभर राबून शेतकऱ्यांनी पिकवलेला कापूस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या जिनिंग प्रेसिंग संस्थेला विकला.

शेतकरी अडचणीत : पैसे देण्यास टाळाटाळसेलू : वर्षभर राबून शेतकऱ्यांनी पिकवलेला कापूस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या जिनिंग प्रेसिंग संस्थेला विकला. २४ तासात कापसाचा चुकारा देण्याचे निर्देश आहे. तरीही वर्षभराचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना कापसाचा एक रूपयाही व्यापाऱ्याने दिलेला नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे. येथील श्रीकृष्ण जिनिंग, प्रेसिंगच्या मालकाने परिसरातील चारशे शेतकऱ्यांचे कापसाचे सहा कोटी २३ लाख रूपये वर्षभरापासून थकवले आहे. ही रक्कम व्याजासह आठ कोटी रूपयांच्या घरात पोहोचली आहे. शासकीय यंत्रणा कारवाईत दिरंगाई करीत असल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटू लागला आहे. श्रीकृष्ण जिनिंग, प्रेसिंग संस्थेत परिसरातील शेतकऱ्यांनी मागील वर्षी कापूस विकला. यातील ४०० च्या जवळपास शेतकऱ्यांना कापसाचा चुकाराच देण्यात आला नाही. शेतकऱ्यांचे तब्बल ६ कोटी २३ लाख रूपये सदर व्यापाऱ्यांकडे थकले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर प्रशासक तलमले, जिनिंग प्रेसिंगचे मालक सुनील टालाटुले, बाजार समितीचे सचिव सुफी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला. शेतकऱ्यांनी समुद्रपूरच्या सहायक दुय्यम निंबंधकाकडेही तक्रार केली. न्यायाधीकरणाने यासंदर्भात तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना पैसे परत करण्याचे आदेशही दिले. पण अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना छदामही मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असूना ते संताप व्यक्त करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)