शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंपाला वीज जोडणीची प्रतीक्षा

By admin | Updated: October 16, 2015 03:01 IST

वर्धा तालुक्यातील इटाळा येथील शेतकऱ्याने ओलिताची सोय व्हावी म्हणून बँकेचे तीन लाख रुपये कर्ज घेऊन विहीर खोदली.

वर्षभरापूर्वी भरली अनामत : ओलिताअभावी पिकांचे नुकसानवायगाव (नि.) : वर्धा तालुक्यातील इटाळा येथील शेतकऱ्याने ओलिताची सोय व्हावी म्हणून बँकेचे तीन लाख रुपये कर्ज घेऊन विहीर खोदली. यानंतर वीज जोडणीसाठी अर्ज करीत अनामत रक्कम भरली. यास एक वर्षाचा काळ लोटला; पण अद्याप वीज जोडणी मिळाली नाही. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.यशवंत कॉलनी वर्धा येथील शेतकरी मनीष तेलरांधे यांचे इटाळा येथे साडे अकरा एकर शेत आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत ते कोरडवाहू शेती करीत होते; पण सतत नुकसान होत असल्याने त्यांनी आयडीबीआय बँकेकडून १२ मे २०१४ रोजी ३ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज घेतले. यात विहिरीचे बांधकाम केले. यानंतर ५ जून २०१४ रोजी महावितरणकडे वीज जोडणीकरिता ५ हजार १०० रुपये अनामत रक्कम भरली. वीज पुरवठा मिळेल, या अपेक्षेने जून २०१४ मध्ये त्यांनी कपाशीची लावण केली; पण मागील हंगामात त्यांना कपाशीला पाणी देता आले नाही. दुसरे पिकही घेता आले नाही. यामुळे त्यांचे नुकसान झाले. वीज जोडणीसाठी सतत पाठपुरावा केला. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राजेंद्र मुळक, केंद्राचे विद्यमान मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे व खासदार रामदास तडस यांनाही निवेदने दिली; पण अद्याप वीज जोडणी मिळाली नाही. अधिकाऱ्यांकडेही पाठपुरावा केला; पण उपयोग झाला नाही. प्रत्येक महिन्यात होणाऱ्या उर्जा मित्रच्या बैठकीला त्यांनी हजर राहुन पाठपुरावा केला. निवीदा निघाल्या नसल्याचे सांगण्यात आले. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत वीज जोडणी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.(वार्ताहर)