शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेत ‘डोअर टु डोअर’ जागर,

By admin | Updated: January 7, 2016 02:42 IST

‘दर गुरूवार नो व्हेईकल डे’ बघता-बघता तिसऱ्या आठवड्यात येऊन पोहोचला तर देवळीकरांसाठी दुसरा गुरूवार आहे. ...

देवळीत दुसरा गुरुवार तर वायगाव येथे प्रारंभ आज नो व्हेईकल डे : पुलगावातही हालचालीवर्धा : ‘दर गुरूवार नो व्हेईकल डे’ बघता-बघता तिसऱ्या आठवड्यात येऊन पोहोचला तर देवळीकरांसाठी दुसरा गुरूवार आहे. अशातच वायगाव (नि.)या गावानेही हा दिवस पाळण्याचा निर्धार केला आहे. आर्वी व पुलगाव येथेही हालचालींना प्रारंभ झाला आहे. ‘लोकमत’ने घेतलेल्या ‘इनिशिएटिव्ह’ला वर्धा जिल्हावासियांकडून वाढता प्रतिसाद बघता जिल्ह्यात ‘दर गुरूवार नो व्हेईकल डे’ होण्याबाबतचे संकेत असल्याचे एकंदर चित्र आहे.‘लोकमत’ने ‘नो व्हेईकल डे’बाबत ‘इनिशिएटिव्ह’ घेताच वर्धेकरांनी स्वयंस्फूर्तीने दर गुरूवारी हा दिवस पाळण्याचा निर्धार केला आणि तो पाळणे सुरूही केले. या मोहिमेत शहरातील सर्वच ६६ सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी पुढाकार घेत सक्रिय सहभाग घेतला. दुसऱ्या आठवड्यापासून या मोहिमेत जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल व जि.प. मुख्य अधिकारी संजय मीना यांनी पुढाकार घेत हा दिवस पाळणे सुरू केले. वर्धेतील शिक्षण संस्थांनीही सहभाग घेत हा दिवस पाळणे सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. याच दिवसापासून खा. रामदास तडस यांनी पुढाकार घेत देवळीतही हा दिवस पाळणे सुरू केले. यानंतर आर्वी पुलगाव ही दोन्ही शहरे हा दिवस पाळण्याच्या निर्णय प्रक्रियेत आहेत. वर्धेपासून ११ किमीवरील वायगाव (नि.) येथील स्व. भैय्यासाहेब उरकांदे महाविद्यालय, महावितरण, पोलीस चौकी, यशवंत विद्यालय व श्रीराम युवा सेना यांनी पुढाकार घेत गुरुवारपासून (दि.७) हा दिवस पाळणार आहे. हे पहिले गाव ठरणार आहे. एकूणच ही मोहीम आता जिल्हा वासियांच्या सुदृढ आरोग्याची चळवळ झालेली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)प्रदूषणजन्य आजारावर जागर करणारवर्धेत ‘नो व्हेईकल डे’बाबत जनजागृतीचा निर्धार वैद्यकीय जनजागृती मंच व आम्ही वर्धेकरने घेतला आहे. शहरातील ३९ वॉर्डांमध्ये दर गुरुवारी जनजागर रॅली काढली जाणार असून नागरिकांशी थेट संवाद साधत प्रदूषणजन्य आजार व त्यावर प्रतिबंध पटवून देणार आहे. ही मोहीम प्रत्येक गुरुवारी सकाळी ७ वाजता असणार, अशी माहिती मंचचे सचिव डॉ. यशवंत हिवंज यांनी दिली. दि. ७ ला वॉर्ड क्र. ७ मध्ये ही रॅली जाणार. रॅलीला ७७ वर्षीय वर्ल्ड जिम येथे झमनलाल प्रीतमलाल भट हिरवी झेंडी दाखवतील. रॅली आयोजन समितीत उपक्रम प्रमुख डॉ. सचिन पावडे असतील. वर्धेतील जागृत नागरिकांनी सर्वांच्या हितावह मोहिमेत सहभागी होऊन गुरुवार हा प्रदूषणमुक्त वाहन विरहीत दिवस पाळण्याचा संदेश घरोघरी पोहोचवावा, असे आवाहन डॉ. सचिन पावडे व संजय इंगळे तिगावकर यांनी केले आहे.