शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या प्रतिमेला कांदे व डाळीची भेट

By admin | Updated: August 30, 2015 01:58 IST

वाढती महागाई लक्षात घेता वर्षभराचा कालावधी लोटूनही केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ वर्धा लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले.

वर्धा : वाढती महागाई लक्षात घेता वर्षभराचा कालावधी लोटूनही केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ वर्धा लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले. स्थानिक सद्भावना भवनाच्या परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला कांदा व डाळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.लोकसभा निवडणुकीत महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप महागाई कमी झालेली नाही. उलट कांदे व डाळींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल आहेत. आजस्थितीत सर्वत्र दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. दुसरीकडे रोजगारीचा प्रश्नसुद्धा वाढीस लागला आहे. कांदा व डाळींचे भाव वाढले असले तरी त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना होत नाही. बहुतांश शेतकऱ्यांनी आधीच त्यांच्याकडील मालाची विक्री केली आहे. या सर्व परिस्थितीत गरीब जनता व शेतकरी भरडल्या जात आहे. त्यामुळे वर्धा लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले.यवेळी लोकसभा उपाध्यक्ष संदीप सुटे, माजी अध्यक्ष महेश तेलरांधे, देवळी विधानसभा अध्यक्ष विपीन राऊत, महासचिव सुधीर वसू यांच्या उपस्थितीत सदर नैवेद्य दाखविण्यात आला.(शहर प्रतिनिधी)