शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

गिट्टीखदान व्यावसायिकांकडून नियमांचा भंग; प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: July 23, 2014 23:45 IST

तालुक्यातील सावली(वाघ), सेलू(मुरपाड) या परिसरात गिट्टी खदानाच्या व्यवसायिकांनी संपूर्ण कायदे व नियम धाब्यावर बसवून पैसा लाटण्याच्या गोरखधंदा सुरू केला आहे. प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.

हिंगणघाट : तालुक्यातील सावली(वाघ), सेलू(मुरपाड) या परिसरात गिट्टी खदानाच्या व्यवसायिकांनी संपूर्ण कायदे व नियम धाब्यावर बसवून पैसा लाटण्याच्या गोरखधंदा सुरू केला आहे. प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. होणाऱ्या प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आला आहे. यावर तत्काळ उपाययोजना होणे गरजेचे आहे. मनसे महिला आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शहरानजीक १० कि़मी. अंतरावर सावली(वाघ), सेलू (मुरपाड) शिवारात स्टोन क्रशर व्यावसायिकांनी मोर्चा वळवून गिट्टी खदानचा उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू केला. या खदानीतून निघणारी बारिक धूळ परिसरात व गावात पसरत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या प्रदुषणामुळे शेतीपिके तर धोक्यात आली आहेच पण परिसरातील नागरिकांनाही दमा, अस्थमा यासारखे आजार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या खदानीमुळे अवजड वाहतूक वाढली आहे. त्यामुळे सामान्य दळणवळण प्रभावित झाले असून रस्तेही खराब होत आहे. परिसरातील मार्गाची सुधारणा करून गिट्टी खदान व्यावसायिकांना कायदे व नियमांचे बंधन घालून द्यावे व सामान्य नागरिकांचे आरोग्य जोपासावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या वतीने निवेदनातून केली आहे. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रागिणी शेंडे, जिल्हासचिव सुनिता भितघरे, तालुका अध्यक्ष सुनिता भोयर, तालुका संघटक प्रभा श्रीवास्तव, तालुका उपाध्यक्ष मंगला ठक, अपर्णा नांदूरकर, शिला मेश्राम आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.(तालुका प्रतिनिधी)