शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेकर सैराट; पोलिसांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे. असे असतानाही नागरिक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता आणि २० एप्रिलपासून लॉकडाउनमध्ये शिथिलता आली, असा गोड गैरसमज करून सोमवारी सकाळपासूनच वर्धेकर सैराट होताना दिसले. कुणी औषधांचे वेष्टण, प्रिस्क्रिप्शन खिशात बाळगत औषध घ्यायला जायचे आहे, तर कुणी भाजी, फळ खरेदीसाठी जायचे आहे, अशी बनावट कारणे सांगत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताना दिसले.

ठळक मुद्देविविध कारणे पुढे करीत रपेट : ८५ वाहनांवर दंडात्मक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतानाही विनाकारण शहरातील विविध रस्त्यांवर फेरफटका मारणाऱ्यांना पोलीस विभागाने सोमवारी फटका दिला. ८५ लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ५ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.देशभरासह संपूर्ण राज्यात कोरोनान कहर केला आहे. विषाणूचा झपाट्याने फैलाव होत आहे. कोरोनाने विदर्भातील काही जिल्हेही कवेत घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्चपासून १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, कोरानाचे थैमान लक्षात घेता लॉकडाऊनला ३० एप्रिल आणि नंतर ३ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या दरम्यान जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला मुभा देण्यात आली असून त्यालाही सकाळी ७ ते दुपारी १ वाजतापर्यंतची मर्यादा आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडणे टाळावे, असे प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे. असे असतानाही नागरिक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता आणि २० एप्रिलपासून लॉकडाउनमध्ये शिथिलता आली, असा गोड गैरसमज करून सोमवारी सकाळपासूनच वर्धेकर सैराट होताना दिसले. कुणी औषधांचे वेष्टण, प्रिस्क्रिप्शन खिशात बाळगत औषध घ्यायला जायचे आहे, तर कुणी भाजी, फळ खरेदीसाठी जायचे आहे, अशी बनावट कारणे सांगत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताना दिसले. यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर वर्दळ होती. बाजारपेठही गर्दीने फुललेली दिसली. गर्दीवर नियंत्रण मिळविण्याच्या अनुषंगाने पोलीस विभागाने अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, शहर ठाणेदार योगेश पारधी यांच्या नेतृत्वात शहरातील वर्दळीचा छत्रपती शिवाजी महाराज चौक सील करून ८५ दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर कारवाई करीत ५ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. अनेक जण जुमानत नसल्याने पोलिसांनी लाठीचा प्रसादही दिला. कारवाईत दिलीप आंबटकर, अमर लाखे, अमरदीप पाटील आदींचा सहभाग होता.वर्धेकर अद्याप गंभीर नाहीच!कोरोनाचा राज्यासह विदर्भातही शिरकाव झाला आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. वर्धा जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण आढळून न आल्याने ग्रीन झोनमध्ये समावेश आहे. यामुळे नागरिक अद्याप आपल्याला काही होत नाही, याच भ्रमात असून नेहमीप्रमाणे नागरिकांचे विनाकारण आणि क्षुल्लक बाबींकरिता रपेट मारणे सुरू आहे. त्यामुळे वर्धेकरांनो, गंभीर व्हा, स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्या, अनावश्यक बाहेर पडणे टाळा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे नागरिकांना करीत होते.लॉकडाऊनबाबत नागरिकांत संभ्रमजीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यास सकाळी ७ ते दुपारी १ वाजतापर्यंतच मुभा आहे. लॉकडाऊन कायम आहे. मात्र, २० एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याचा नागरिकांत संभ्रम दिसून आला. त्यामुळे सकाळपासून दुपारी १ वाजतानंतरही विविध रस्त्यांवर वर्दळ होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या