निष्काम सेवा हिच खरी देशसेवा

By Admin | Updated: December 25, 2015 03:01 IST2015-12-25T03:01:07+5:302015-12-25T03:01:07+5:30

होमगार्ड पदाची जबाबदारी सांभाळताना त्यात सेवाभाव हा अंतर्गनिहीत असतो. त्यामुळे होमगार्डनी निष्काम सेवा करणे गरजेचे आहे, कारण तीच खरी देशसेवा आहे,

Unemployment Service | निष्काम सेवा हिच खरी देशसेवा

निष्काम सेवा हिच खरी देशसेवा

स्मिता पाटील : प्रशिक्षण शिबिर
वर्धा : होमगार्ड पदाची जबाबदारी सांभाळताना त्यात सेवाभाव हा अंतर्गनिहीत असतो. त्यामुळे होमगार्डनी निष्काम सेवा करणे गरजेचे आहे, कारण तीच खरी देशसेवा आहे, असे विचार अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासन गृहविभागातर्फे पुरूष उजळणी प्रशिक्षण शिबिर आयोकित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन जिल्ह्याच्या गृह रक्षक दलाच्या जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील यांचे हस्ते झाले. त्यावेळी विचार व्यक्त करताना पाटील बोलत होत्या.
कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्याचे प्रभारी द्वितीय समादेशक डॉ. चंद्रकांत हिवरे, प्रभारी केंद्रनायक राजपूत, प्रभारी सामग्री प्रबंधक सुभेदार संतोषकुमार जैस्वाल, प्रशासकीय अधिकारी दीपक येवतकर, चंद्रशेखर कुंभारे, कंपनी कमांडर चंद्रशेखर देशकर उपस्थित होते. मार्गदर्शनात पाटील म्हणाल्या, आपण स्वत: आपल्या जीवनाच्या शिल्पकार आहोत. आपण शरीरावर खाकी वर्दी घातल्यानंतर आपला आत्मविश्वास आणखी वाढतो. या आत्मविश्वासाचा फायदा करून घेत एक उत्कृष्ट समाजसेवक बनून समाजातल्या वाईट रूढीला आळा घालण्याची जबाबदारी ही होमगार्डची आहे. ही जबाबदारी पार पाडताना कुठलीही हयगय करू नका असेही त्या यावेळी म्हणाल्या.संचालन पलटन नायक दीपक राजपूत यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चंद्रकांत हिवरे यांनी केले. आभार जैस्वाल यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Unemployment Service