शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अपार्टमेंटच्या वाहनतळावर उभारले अनधिकृत गाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

वर्ध्यातील मे. पुष्पदत्त बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, कच्छी लाईनचे संचालक विलास मानलवार यांनी कारला चौकातील जागेवर हेरिटेज प्लाझा नावाने सहा सदनिकेचे (फ्लॅट) अपार्टमेंट बांधले आहे. या अपार्टमेंटचे विकसक आणि मालक एकच असून त्यांनी पार्किंगच्या जागेत अनधिकृतरित्या दुकानाचे गाळे बांधले आहे.

ठळक मुद्देहेरिटेज प्लाझाच्या मालकाचा प्रताप : फ्लॅटधारकांची जिल्हा प्रशासनाकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अपार्टमेंटमध्ये असलेल्या फ्लॅटधारकांना पुरेशी पार्कीगची व्यवस्था करून देणे बंधनकारक असतानाही कारला चौकातील हेरिटेज प्लाझा अपार्टमेंटच्या मालकाने या नियमाला बगल दिली आहे. फ्लॅटधारकांच्या मालकीची अर्धी पार्कीगची जागा गिळंकृत करुन अनधिकृतरीत्या दुकानाचे गाळे बांधले आहे. त्यामुळे फ्लॅटधारकांची मोठी अडचण झाली असून त्यांनी या संदर्भात प्रशासनाकडे तक्रार केली आहे.वर्ध्यातील मे. पुष्पदत्त बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, कच्छी लाईनचे संचालक विलास मानलवार यांनी कारला चौकातील जागेवर हेरिटेज प्लाझा नावाने सहा सदनिकेचे (फ्लॅट) अपार्टमेंट बांधले आहे. या अपार्टमेंटचे विकसक आणि मालक एकच असून त्यांनी पार्किंगच्या जागेत अनधिकृतरित्या दुकानाचे गाळे बांधले आहे.सदनिका खरेदी करण्यापूर्वी मानलवार यांना विचारणा केली असता विक्री झाल्यानंतर पार्कीग मोकळी करुन दिली जाईल, असे सांगितले होते. पण, आता विक्री झाल्यानंतर मानलवार हे पार्कीगची जागा मोकळी करुन देण्यासाठी नकारघंटा वाजवित आहे.त्यामुळे सदनिकाधारकांनी हक्काची पार्किंगची जागा मिळावी याकरिता जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत प्रशासन तसेच पोलिसांनाही तक्रार दिली असून योग्य कारवाई करण्याची मागणी पी.टी.पांडे, विशाल उराडे, दीपक देशमुख, माधव शेरकुले व अमोल जिभकाटे या सदनिकाधारकांनी केली आहे.सदनिकाधारकांच्या जीवितास धोकाकारला चौकात मे.पवनसुत पेट्रोलियम एजन्सीचा पेट्रोल व डिझेल पंप आहे. या एजन्सीच्या मालकाने पेट्रोलपंपावर विक्री होणाऱ्या इंजिन ऑईलचा साठा या हेरिटेज प्लाझा अपार्टमेंटमधील पार्किंगच्या जागेवर बांधलेल्या गाळ्यामध्ये ठेवला आहे. यासंदर्भात कुठलीही परवानगी घेतली नाही तसेच सदनिकाधारकांना माहितीही दिली नाही. या ज्वलनशील पदार्थामुळे सदनिकाधारकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अपार्टमेंट मालकाने सदनिकाधारकांकडून मोठी रक्कम घेऊनही त्यांच्या जीविताशी खेळ चालविल्याने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.