शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

कोरडवाहू क्षेत्रातील कपाशीची उलंगवाडी

By admin | Updated: December 21, 2015 02:24 IST

शेतकऱ्यांना कपाशीकडून असलेल्या आशा मावळत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. अत्यल्प पावसामुळे जमिनीत ओलावा नसल्याने कोरडवाहू शेतातील कपाशी वाळत असल्याचे दिसते.

उत्पादनात घट : शेतकरी चिंतित; एका वेच्यातील कापसावरच मानावे लागले समाधान
विजय माहुरे घोराड
शेतकऱ्यांना कपाशीकडून असलेल्या आशा मावळत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. अत्यल्प पावसामुळे जमिनीत ओलावा नसल्याने कोरडवाहू शेतातील कपाशी वाळत असल्याचे दिसते. याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. कपाशीची झाडे वाळत असल्याने शेतकऱ्यांकडून उलंगवाडी सुरू झाली आहे.
खरीप हंगामात सोयाबीनची नापिकी झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यामुळे कापसावर सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. पावसाळ्याच्या दिवसात प्रारंभी पिकाला समाधानकारक पाऊस झाल्याने कपाशीची वाढ झाली. त्यामुळे चांगले उत्पन्न येईल, अशी आशा व्यक्त केली जात होती. पण पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची आशा मावळली. अशात उशिरा का होईना बोर प्रकल्पाचे पाणी वितरकांना सोडण्यात आले. यामुळे सोय असलेल्या शेतकऱ्यांनी ओलित केले. यातून तरी उत्पन्नात वाढ होईल, अशी आशा होती. दरम्यान, कपाशीवर लाल्याचे सावट दिसू लागल्याने उत्पन्नाची आशा मावळली. एकरी ४ ते ५ क्विंटल कापसावर समाधान मानावे लागले. यामुळे सर्वत्र कपाशीकडून मिळणाऱ्या उत्पन्नाची आशा मावळली. यामुुळे कोरडवाहू क्षेत्रातील कपाशीची उलंगवाडी करणे सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. कपाशीवर आर्थिक घडी असल्याने कापूस वेचणी होताच ३,८०० ते ४,००० हजार रुपये क्विंटल दराने विकावा लागल्याने कोरडवाहू शेती करणारे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहे.

बाजारात मिळणाऱ्या दराची चिंता
जिल्ह्यातच नव्हे राज्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. अशात उत्पन्न कमी होत असतानाही शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अत्यल्प दर मिळत आहे. या पिकांवरच शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक व्यवहार अवलंबून आहेत. सध्या कापसाला मिळणारा भाव हा उत्पादन खर्चावर आधारित नाही. शिवाय तो स्थिर नाही. यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याची ओरड होत आहे.

ढगाळ वातावरणामुळे तुरीचे पीक धोक्यात
गत काही दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसून येत आहे. या वातावरणाचा फटका तुरीला बसत आहे. ढगाळ वातावरणामुळे तुरीची फुले गळत आहेत. शिवाय अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. असेच वातावरण आणखी काही दिवस राहिल्यास तुरीचे पीक धोक्यात येण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. यामुळे उत्पादनात घट येण्याची भीती निर्माण झाली आहे.