शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

दोन अल्पवयीन दुचाकी चोरांना अटक

By admin | Updated: July 24, 2014 23:59 IST

दुचाकी चोरून त्या विकण्याकरिता नाही तर केवळ हौस म्हणून फिरविणाऱ्या दोन चोरट्यांना हिंगणघाट पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोनही चोरटे अल्पवयीन असून

वर्धा : दुचाकी चोरून त्या विकण्याकरिता नाही तर केवळ हौस म्हणून फिरविणाऱ्या दोन चोरट्यांना हिंगणघाट पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोनही चोरटे अल्पवयीन असून त्यांच्याजवळून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जुलै रोजी जगन्नाथ वॉर्ड येथील मोहम्मद अमीन अब्दुल गणी यांच्या घरासमोर ठेवलेल्या दोन दुचाकींची चोरी झाली होती. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना गुन्हे अन्वेषन विभागाच्या चमूला नांदगाव चौरस्त्यावर दोन युवक दुचाकीवर संंशयास्पद स्थितीत दिसून आले. पोलीस दिसताच या दोनही युवकांनी पळ काढला. त्यांचा पाठलाग करून त्यांना नांदगाव मार्गावर असलेल्या बालाजी जिनिंगजवळ पकडण्यात आले. विचारपूस केली असता त्यांच्या जवळ असलेल्या दोन्ही दुचाकी जगन्नाथ वॉर्ड येथील असल्याचे समोर आले. त्यांना आणखी विचारणा केली असता त्यांनी शहरात काही ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकाचे वय १७ तर दुसऱ्याचे वय १४ वर्षे असल्याचे समोर आले.या कारवाईत त्यांच्याजवळून एमएच ३२ एफ ५४२७, एमएच ३२ एन ४५५६, एमएच ३२ जी २६८९, एमएच ३२ एच ७४९८ व एमएच ३२ एल ६१२० क्रमांकाच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या गाड्यांची किंमत एक लाख ६० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर कारवाई ठाणेदार एम. बोडखे, सहायक निरीक्षक एस,एन. घोनमोडे यांच्यासह जमादार निलेश मेंढे, निरंजन वरभे, सुनील पांजळे, राजेंद्र हाडके यांनी केली. (प्रतिनिधी)