शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांना पाठविल्या अडीच हजार राख्या

By admin | Updated: August 27, 2015 02:19 IST

स्थानिक प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे सीमेवरील सैनिकांना रक्षाबंधनाच्या पर्वावर गत २० वर्षापासून राख्या पाठविण्यात येतात.

२० वर्षांची परंपरा : रोव्हर्स, रेंजर्स, एन.सी.सी. छात्र सैनिकांचा उपक्रमवर्धा : स्थानिक प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे सीमेवरील सैनिकांना रक्षाबंधनाच्या पर्वावर गत २० वर्षापासून राख्या पाठविण्यात येतात. याच उपक्रमात रोव्हर पथक, राणी लक्ष्मीबाई रेंजर युनिट व एन.सी.सी. छात्रसैनिकांनी सहभाग दर्शवित या वर्षीही अडीच हजार राख्या तयार करून पाठविण्यात आल्या. सीमेवर रक्षण करीत असलेल्या सैनिकांप्रती या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. देवळी येथील एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील नेताजी सुभाषचंद्र बोस रोव्हर पथक, प्रहार संस्थेतर्फे आर्मी युनिट्सकडे राख्या सुपूर्द केल्या. या राख्या चीन सीमा, भारत-पाक सीमा व भारत-तिबेट सीमेवर असलेल्या आर्मी युनिट्सना रवाना करण्यात आल्या आहेत. राख्या पाठविण्याचा कृतज्ञता कार्यक्रम देवळी येथे स्कॉऊट भवनात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोव्हर लिडर लेफ्टनंट प्रा. मोहन गुजरकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक दीपक साखरे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक साखरे म्हणाले, देशाच्या सीमेवरील सैनिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले कर्तव्य बजावित असतात. कर्तव्यापूढे सण, उत्सव व वैयक्तिक कार्यक्रमांना ते दुय्यम स्थान देतात. देशाला सैनिकांसारखीच मानसिकता असलेल्या तरूणांची नितांत गरज आहे. या उपक्रमात अत्यंत प्रशंसनीय असून त्यात सहभागी रोव्हर्स, रेंजर्स व एन.सी.सी. छात्र सैनिकांची कृतज्ञता खरच इतरांना प्रेरणादायी आहे, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी सार्जेट उमा मसराम, स्मिता सुरजूसे, दिनेश रामगडे, रेंजर कंपनी सार्जेट मेजर सुरज पोटफोडे, वैभव भोयर, आशिष परचाके, साकिब पठाण यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक लेफ्टनंट प्रा. गुजरकर यांनी केले. संचालन सहाय्यक रेंजर लिडर अश्विनी घोडखांदे हिने केले तर आभार अंडर आॅफिसर रवी बकाले यांनी मानले.(स्थानिक प्रतिनिधी)