शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

कृषीच्या वीज पुरवठ्यात दोन तासांची कपात

By admin | Updated: May 9, 2017 01:03 IST

राज्यात वीज निर्मिती कमी झाल्याने भारनियमनात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

गावांनाही भारनियमनाचे चटके : महावितरणने लक्ष देण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात वीज निर्मिती कमी झाल्याने भारनियमनात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. वीजे अभावी गावाकऱ्यांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. तर पुरेसा पुरवठा होत नसल्याने कृषी क्षेत्राच्या वीज पुरवठ्यात दोन तासांनी कपात करण्यात आली आहे. पूर्वी कृषी क्षेत्राकरिता १० तास वीज देण्यात येत होती. ती आता आठ तास करण्यात आली आहे. यात रात्री आठ आणि दिवसा आठ तास नियमित वीज देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वास्तविकतेत मात्र दिवस सोडा रात्रीही वीज राहत नसल्याचे दिसून आले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे दिसून आले आहे. वीज निर्मितीत वाढ होईपर्यंत नागरिकांना भारनियमनाचे चटके सहन करावे लागत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. पिकांना पाणी मिळत नसल्याने भाजीवर्गीस पिके संकटात आली आहेत. पवनारात केळीच्या बागा संकटात लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : पवनार परिसरात गत काही दिवसांपासून भारनियमनाने डोके वर काढले आहे. परिणामी शेतकऱ्यांना ओलीत करणे अवघड जात आहे. यामुळे वाढते उन्हाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून पिके कोमेजत आहे. आता महावितरणही शेतकऱ्यांच्या जीवावर उठणार काय, असा प्रश्न होत आहे. या गावात कृषी फिडरचाच नाही तर गावातील वीज पुरवठाही नेहमी खंडीत होत असल्याचे दिसून आले. यामुळे गावकऱ्यांना भर उन्हात घरी चटके सहन करण्याची वेळ आली आहे. या भागात बागायतदार शेतकरी आहेत. अनेकांच्या शेतात केळीचे पीक आहे. सध्या ते लहान असल्याने त्याला पाण्याची गरज आहे. परंतु येथे भारनियमन असल्याने या पिकांना पाणी देण्याकरिता शेतकऱ्यांची चांगलीच अडचण आहे. शासनाने दिलेल्या सिंचनाच्या सुविधेमुळे पाणी उपलब्ध आहे. मात्र वीज पुरवठा नसल्याने पाणी असताना ते पिकांना देणे कठीण झाले आहे. पाणी नसल्याने तळपत्या उन्हामुळे पीक करपण्याच्या मार्गावर आहे. यात शेतकऱ्यांवर संकट कोसळण्याची शक्यता आहे. उन्हामुळे शेतात असलेली केळीचे झाडे जळत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना ओलिताकरिता नियमित वीज पुरवठा करावा अशी मागणी होत आहे. वीज निर्मितीत घट होत आहे. शिवाय जिल्ह्यात वादळ जोर काढत आहे. यामुळे काही काळ वीज पुरवठा खंडीत झाला होता. मात्र आता तो सुरळीत झाला आहे. पवनार भागात कृषी पंपांना नियमित वीज मिळत आहे. - सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता, महावितरण वर्धा