शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळ घालणारे दोन मद्यपी शिक्षक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 06:00 IST

आष्टी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या चिंचोली येथील जि.प. प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक सतीश नगराळे यांनी १३ जानेवारीला मद्यधुंद अवस्थेत जि. प. मध्ये येऊन चांगलाच गोंधळ घातला होता. सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास नगराळे यांनी जिल्हा परिषदेत उपस्थित जिल्हा परिषदचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्षांच्या दालनासमोरुन दुचाकी चालवित गोंधळ घातला होता.

ठळक मुद्देसीईओंचा आदेश : शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्षांच्या दालनासमोरून दुचाकी दामटवित गोंधळ घालणाऱ्या आणि मोझरी येथील क्रीडा संमेलनात धिंगाणा घालणाऱ्या दोन्ही मद्यपी शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी हा आदेश पारित करून दोघांनाही चांगलाच दणका दिला आहे.आष्टी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या चिंचोली येथील जि.प. प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक सतीश नगराळे यांनी १३ जानेवारीला मद्यधुंद अवस्थेत जि. प. मध्ये येऊन चांगलाच गोंधळ घातला होता. सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास नगराळे यांनी जिल्हा परिषदेत उपस्थित जिल्हा परिषदचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्षांच्या दालनासमोरुन दुचाकी चालवित गोंधळ घातला होता. हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चाणकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विषय शिक्षक प्रशांत हुलके यांनी ९ जानेवारीला मोझरी येथील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला होता. त्याना कार्यक्रमातून बाहेर जाण्यास सांगितले असता ते कुणालाही जुमानत नव्हते. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सहाय्यक शिक्षक सतीश नगराळे व विषय शिक्षक प्रशांत हुलके या दोघांनाही तत्काळ निलबित केल्याने शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे.एकाला कारंजा तर दुसऱ्याला समुद्रपूरसहाय्यक शिक्षक सतीश नगराळे यांना निलंबन काळात कारंजा पंचायत समिती या मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले आहे. कारंजाचे गटविकास अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.विषय शिक्षक प्रशांत हुलके यांना निलंबन काळात समुद्रपूर पंचायत समिती या मुख्यालयी राहण्याचे आदेश आहे. त्यांनाही समुद्रपूरचे गटविकास अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.

टॅग्स :Teacherशिक्षक